लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी लक्ष्मणासारख्या जिवलग मित्राची भेट घेऊन आस्थेने चौकशी केली.
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी स्वतः गाडीचे सारथ्य करून निष्ठावान मित्र भैयासाहेब चांगण समवेत जिवलग मित्र राहुल रुपनवर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट.
मांडवे (बारामती झटका)
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी निष्ठावान मित्र भैया चांगण यांच्या गाडीचे स्वतः सारथ्य करून सुखदुःखामध्ये नेहमी सहभागी असणारे लक्ष्मणासारख्या राहुल रुपनवर या जिवलग मित्राच्या निवासस्थानी भेट घेऊन आस्थेने चौकशी करून श्रीकृष्ण व सुदाम यांच्या मैत्रीचा उजाळा दिला आहे.
मांडवे ता. माळशिरस येथील सोज्वळ व सुसंस्कृत स्वभाव असणारे राहुल रुपनवर यांची आणि लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची आमदार होण्याअगोदर पासून मैत्री आहे. राम सातपुते आमदार जरी झाले तरी मैत्रीमध्ये तीळमात्र फरक केलेला नाही. मैत्रीचे नाते अतूट ठेवलेले आहे. माळशिरस तालुक्यात राम सातपुते यांचे राहुल रुपनवर यांच्यासारखे अनेक जिवलग मित्र आहेत. राहुल रुपनवर कायम सुख दुःखामध्ये लक्ष्मणासारखे आमदार राम सातपुते यांच्या समवेत असतात.
लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचारासाठी गेलेले होते. दरम्यानच्या काळामध्ये जिवलग मित्र राहुल रुपनवर यांच्या पायाला कुरूप होऊन जखम झालेली होती. त्याचे ऑपरेशन केलेले होते. स्वतःची गाडी घरगुती कामासाठी बाहेर गेलेली होती. जिवलग मित्राच्या भेटीसाठी भारतीय जनता पार्टी नातेपुते शहराध्यक्ष निष्ठावान मित्र भैय्यासाहेब चांगण यांच्या गाडीचे सारथ्य करून त्यांना समवेत घेऊन राहुल रुपनवर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन आस्थेने चौकशी करून श्रीकृष्ण व सुदामा यांच्या मैत्रीचा उजाळा दिला आहे. त्यावेळी रुपनवर परिवारातील सदस्यांच्या चेहऱ्यावर मैत्रीच्या नात्यातील आनंद ओसंडून वाहत होता.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng