तरंगफळ येथे स्व. रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बहुउद्देशीय दिव्यांग संस्था व प्रहार संघटना माळशिरस तालुका यांच्यावतीने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
दिव्यांगाना माणूस समजा, त्यांना त्यांची कमतरता जाणवू देऊ नका – मीनाक्षी जाधव
माळशिरस (बारामती झटका)
तरंगफळ, ता. माळशिरस येथे स्व. रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बहुउद्देशीय दिव्यांग संस्था व प्रहार संघटना माळशिरस तालुका यांच्यावतीने ३ डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन श्रीनाथ विद्यालय तरंगफळ येथे घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या दिव्यांग आंतरराष्ट्रीय खेळाडू मीनाक्षी जाधव यांनी मुलांशी संवाद साधला. तसेच त्यांनी स्वतःच्या अनुभवातून मुलांचे मनोधैर्य वाढवले.

यावेळी मीनाक्षी जाधव व श्रीनाथ विद्यालय तरंगफळचे संस्थापक व अध्यक्ष श्री. आबासाहेब शेंडगे यांच्याहस्ते विद्यार्थ्यांना वही, पेन, पेन्सिल व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली. २००४ साली मदनसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग दिन साजरा करण्यास सुरवात झाली व ती आजपर्यंत चालू आहे.


या कार्यक्रमासाठी दिव्यांग आंतरराष्ट्रीय खेळाडू मीनाक्षी जाधव, स्व. रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बहुउद्धेशिय दिव्यांग संस्थाचे अध्यक्ष तसेच प्रहार संघटना माळशिरस तालुक्याचे अध्यक्ष गोरख जानकर, श्रीनाथ विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब शेंडगे, माजी सरपंच महादेव तरंगे, माजी सरपंच सुमित तरंगे, माजी सरपंच भानुदास तरंगे, माजी उपसरपंच अवी तरंगे, माजी उपसरपंच शशिकांत साळवे, गोविंद कांबळे, मधुकर तरंगे, जगुबाई जानकर, कुलदीप जानकर, इशानवी जानकर, नारायण वाघमोडे, रामचंद्र वाघमोडे, अनिल पवार आदींसह जि. प. शाळा तरंगफळचे विद्यार्थी, शिक्षक, जि. प. शाळा वाघमोडे वस्ती येथील विद्यार्थी व शिक्षक, श्रीनाथ विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश गोरवे सरांनी केले.
आपली इच्छाशक्ती बळकट ठेवा. मनोधैर्य खचू देऊ नका. जिद्द व चिकाटी अंगी ठेवा यश हे मिळेलच. दिव्यांगाना माणूस समजा. त्यांना त्यांची कमतरता जाणवू देऊ नका. त्यांना सहकार्य करा. – मीनाक्षी जाधव (आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू)

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Your article gave me a lot of inspiration, I hope you can explain your point of view in more detail, because I have some doubts, thank you.