Uncategorizedताज्या बातम्या

धर्मपुरी येथील ग्रामसेविका साळवे यांची बदली रद्द करण्याबाबतचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ग्रामस्थांच्या वतीने निवेदन

अन्यथा कुलूपबंद आंदोलन करणार….

धर्मपुरी (बारामती झटका)

धर्मपुरी ता. माळशिरस येथे धर्मपुरी ग्रामपंचायतीवर ग्रामसेविका एस. सी. साळवे या कार्यरत आहेत. त्यांची बदली रद्द करण्यासाठी ग्रामस्थांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांना निवेदन दिले आहे.

सदर निवेदनात असे म्हटले आहे की, धर्मपुरी येथील कार्यरत असणाऱ्या ग्रामसेविका सौ. साळवे यांची बदली आपल्या कार्यालयाकडून झालेली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ग्रामसेविका साळवे यांनी धर्मपुरी ग्रामपंचायतीचा पदभार स्वीकारला होता. त्या वेळेपासून गावातील सर्व नागरिकांना तसेच सर्व आजी-माजी पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन त्या गावाच्या हिताचे निर्णय घेत आहेत. सन 2017 ते 2022 पर्यंत गावातील घरपट्टी, पाणीपट्टी, इतर कर तसेच विविध योजनेच्या माध्यमातून गावासाठी उपलब्ध असणारा निधी खर्च करण्यासाठी त्या प्रयत्नशील आहे. धर्मपुरी गाव हे गेल्या काही वर्षांपासून घरपट्टी, पाणीपट्टी तसेच इतर कर आकारणी साधारणपणे 30 ते 35 लाख थकीत आहे. ग्रामसेविका साळवे यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून जवळपास सहा ते सात लाखाच्या आसपास स्वतः लोकांच्या दारात जाऊन संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कर वसूल केला आहे व अजूनही चालूच आहे. तसेच धर्मपुरी येथील सार्वजनिक पाणीपुरवठा असणारी विहीर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 मध्ये 2018 मध्ये संपादित झाली आहे. सन 2018 पासून नवीन विहीर जागा उपलब्ध व विहीर खोदाईचा प्रलंबित असणारा प्रश्न ग्रामसेविका साळवे व त्यांचे ग्रामपंचायत कर्मचारी यांनी स्वतः धर्मपुरी या ठिकाणी राहत असणारे शेतकरी रामदास शिवराम पाटील यांना विनंती करून विहीरीसाठी ०.०२ गुंठे जागा विना मोबदला घेवून त्या जागेचे बक्षीस पत्र स्वतः करून घेतले आहे. तसेच गावामध्ये रोज १० ते ६ पर्यंत हजर राहून गावातील ग्रामस्थांना सेवा पुरवत आहेत. तसेच इतर योजनांचा अखर्चित निधी खर्च करण्यासाठी प्रयत्नशील असतानाही प्रशासनाकडून त्यांची बदली करण्यात येत आहे.

ही बाब धर्मपुरी गावातील ग्रामस्थांसाठी धक्कादायक असून धर्मपुरी गावाच्या अहिताची आहे. ग्रामसेविका साळवे यांच्याबाबत धर्मपुरी गावामधून एकही लेखी अथवा तोंडी तक्रार नसताना आपल्या कार्यालयाकडून राजकीय दबावापोटी गावाचा अहिताचा निर्णय होत आहे, ही बाब निंदनीय आहे. त्यामुळे आम्ही सह्या करणारे धर्मपुरी ग्रामस्थ ग्रामसेविका साळवे यांची बदली तत्काळ रद्द करण्याची आपल्याकडे मागणी करत आहोत. आपण बदली रद्द न केल्यास आम्ही धर्मपुरी ग्रामपंचायतीस नवीन ग्रामसेवक यांना चार्ज घेवू देणार नाही. व ग्रामपंचायतीस टाळा ठोकणार (कुलुपबंद) आंदोलन करणार आहे, याची दाखल घेण्यात यावी.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button