Uncategorized

मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत फलटण-पंढरपूर रेल्वेसाठी राज्याच्या निधीची मंजुरी देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस.

लोणंद-फलटण-पंढरपूर प्रलंबित रेल्वेचे स्वप्न सत्यात साकार होणार.

कार्तिकी एकादशी दिवशी खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या रूपाने विठुराया पावला.

पंढरपूर ( बारामती झटका )

स्वातंत्र्यपूर्व काळापासून लोणंद-फलटण-पंढरपूर प्रलंबित रेल्वेचे स्वप्न सत्यात साकार होणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मंगळवेढा येथे जाहीर व्यासपीठावरून मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत फलटण-पंढरपूर रेल्वेसाठी राज्याच्या निधीची मंजुरी देणार असल्याची घोषणा केली आहे. कार्तिकी एकादशी दिवशी खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना संत दामाजीच्या नगरीत उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या रूपाने पांडुरंग पावला. माजी खासदार लोकनेते स्वर्गीय हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्यासह अनेकांनी लोणंद-फलटण-पंढरपूर रेल्वेचे स्वप्न पाहिलेले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी घोषणा केलेली असल्याने खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नाला यश आले असल्याने महाराष्ट्रातील वारकरी व विशेष करून फलटण-माळशिरस-पंढरपूर तालुक्यातील तमाम जनतेला आनंद झालेला आहे.

माढा लोकसभा मतदार संघ पूर्वीचा पंढरपूर लोकसभा मतदारसंघ होता‌. त्यामध्ये फेरबदल करून माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झालेली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक खासदार होऊन गेले मात्र, यशस्वी खासदार म्हणून रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या कार्यकाळात स्वातंत्र्यपूर्व काळातील लोणंद-फलटण-पंढरपूर रेल्वेचा प्रलंबित प्रश्न देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यामुळे अनेक दिवसाचे स्वप्न सत्यात उतरणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस कार्तिकी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजेसाठी सपत्नीक आलेले होते. महापूजेनंतर मंगळवेढा येथे पंढरपूर, मंगळवेढ्याचे आ. समाधान अवताडे यांनी कारखान्याचे विविध कार्यक्रम व शेतकरी मेळाव्याचे आयोजन केलेले होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी सांगितले की, माढा लोकसभेचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि मी स्वतः पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व रेल्वेमंत्री यांना भेटून लोणंद-फलटण-पंढरपूर रेल्वे मार्गासह महाराष्ट्रातील अनेक रेल्वे मार्गांना निधीची मागणी केलेली होती. केंद्राने तात्काळ मागणी मान्य केली. राज्याचा वाटा यामध्ये समाविष्ट करावा लागतो. महाविकास आघाडी सरकार गेल्या अडीच वर्षांमध्ये असताना सरकारला अनेक वेळा मागणी केली मात्र, दळभद्री सरकार यांनी रेल्वेसाठी आम्ही निधी देणार नाही अशी आडमुठी भूमिका घेतलेली असल्याने केंद्राची इच्छा असूनसुद्धा महाराष्ट्र सरकारमुळे अडचण निर्माण झालेली होती.

सध्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार जाऊन जनतेच्या हिताचे सरकार स्थापन झालेले आहे. महाराष्ट्राचा निधीचा वाटा येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीमध्ये निर्णय घेऊन अनेक दिवसाचा लोणंद-फलटण-पंढरपूर मार्गाचा प्रलंबित असणारा प्रश्न व अनेक प्रश्न मार्गी लावून येणाऱ्या निवडणुकीत जनतेसमोर जाऊ, असा आत्मविश्वास दिलेला असल्याने रेल्वेचे स्वप्न सत्यात साकार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फलटण, माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

माढा लोकसभा मतदार संघाला कार्यतत्पर खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर लोकप्रतिनिधी लाभल्यापासून अनेक प्रश्न मार्गी लागलेले आहेत. माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील २२ गावांचा निरा-देवधरचा प्रश्न, माळशिरस तालुक्यातून बुलेट ट्रेन सुद्धा जाणार आहे, सदरचा बुलेट ट्रेनचा प्रश्न मार्गी लागणार आहे. स्वातंत्र्य काळानंतर अनेक खासदार होऊन गेले मात्र, यशस्वी खासदार म्हणून माढा लोकसभेचे कार्यतत्पर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची कारकीर्द सोनेरी पानावर लिहिण्यासारखी झालेली पाहावयास मिळत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort