माळशिरस तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडी होणार.
थेट जनतेतील सरपंच निर्णायक मताचा वापर करण्याची शक्यता
माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्यातील थेट जनतेतील सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या निवडणूक प्रक्रिया पार पडलेल्या असून उपसरपंच पदाच्या निवडी सुरू आहेत. दि. ६ जानेवारी रोजी १० ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडी झालेल्या आहेत. आज १६ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडी होणार आहेत. थेट जनतेतील सरपंच यांना सदस्यांसमवेत एक मत व समसमान झाल्यानंतर निर्णायक मत देण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. यामध्ये निर्णायक मताचा वापर होण्याची दाट शक्यता आहे.

माळशिरस तालुक्यातील पिसेवाडी, जांबुड, माळेवाडी बोरगाव, फळवणी, धानोरे, आनंदनगर, नेवरे, मारकडवाडी, चांदापुरी, गुरसाळे, तरंगफळ, लोंढे मोहितेवाडी, मेडद, तामशीदवाडी, खंडाळी दत्तनगर, तिरवंडी अशा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडी आहेत. यामध्ये सरपंचाच्या निर्णायक मतामुळे संख्याबळ असणाऱ्या पॅनलचे गणित बिघडणार आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng