माळशिरस पंचायत समिती जिल्हा परिषद बांधकाम उपविभागचा उप अभियंता पदाचा श्री. आर. एस. रणनवरे यांच्याकडे प्रभारी पदभार.
उपअभियंता अशोकराव रणनवरे सेवानिवृत्त झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर प्रभारी उप अभियंता पदाचा प्रभारी कार्यभार श्री. आर.एस. रणनवरे यांच्याकडे सुपूर्द.
माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस पंचायत समिती मधील जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग माळशिरसचे उप अभियंता श्री. अशोकराव अण्णासो रणनवरे सेवानिवृत्त झालेले असल्याने उप अभियंता पदाचा प्रभारी कार्यभार श्री. आर. एस. रणनवरे यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे.


महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते श्री. अशोकराव रणनवरे यांचा सन्मान करून दि. 30/11/2022 रोजी सेवानिवृत्त झालेले आहेत. उप अभियंता पदाचा प्रभारी कार्यभार श्री. आर. एस. रणनवरे त्यांच्याकडे देण्यात आलेला आहे. श्री. आर. एस. रणनवरे यांची जिल्हा परिषदेमध्ये 1990 मध्ये कनिष्ठ अभियंता पदावर नियुक्ती झाली होती. 2014 सालापासून शाखा अभियंता पदावर कार्यरत आहेत. त्यांनी दि. 01/12/2022 पासून उपअभियंता पदाचा प्रभारी कार्यभार स्वीकारलेला आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

