माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करून वडिलांच्या स्मृती जपल्या…
गुरसाळे ( बारामती झटका)
गुरसाळे तालुका माळशिरस येथील प्रगतशील बागायतदार विठोबा धोंडीबा शेळके यांचे वयाच्या 86 व्या वर्षी शुक्रवार दिनांक 20 23 रोजी वार्धक्याने दुःखद निधन झालेले होते त्यांचा रक्षा विसर्जन तिसऱ्याचा कार्यक्रम रविवार दिनांक 3 9 20 23 रोजी सकाळी साडेसात वाजता होता त्यावेळी स्वर्गीय धोंडीबा शेळके यांच्या परिवारातील पत्नी श्रीमती शांताबाई तीन मुले अण्णा दत्तात्रय ज्ञानेश्वर व मुलगी सखुबाई शरद नरूटे या परिवारांनी स्वर्गीय विठोबा शेळके यांच्या स्मृति अनोख्या पद्धतीने जपलेल्या आहेत रक्षेचे विसर्जन न करता त्यांच्या आठवणीसाठी वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल व स्मृती जपण्याचे काम केलेले आहे
स्वर्गीय विठोबा धोंडीबा शेळके यांच्या परिवारांनी अनोख्या पद्धतीने स्मृती जपत असताना भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते पंचायत समिती सदस्य व लक्ष्मी कृष्ण नागरी पतसंस्थेचे चेअरमन ज्ञानराज उर्फ
माऊली पाटील कारूंडे गावचे माजी सरपंच हनुमंत पाटील भाजपचे माळशिरस तालुका उपाध्यक्ष महादेव केसकर ह.भ.प. मंगलदास महाराज एकशिव ज्येष्ठ नेते शहाजी धायगुडे ,उद्योजक सतीश ढेकळे दादा पाटील , कुरुबावी
मयूर पाटील,आबा पाटील,अमोल पाटील,युवराज रूपनवर,
गणेश पाटील,आप्पासाहेब रूपनवर, राज माने पाटील
,प्रतिक जानकर,शंकर जानकर,दिलीप कोरटकर,अनिल भोईटे,अनिल मोरे,सोमनाथ चव्हाण,संतोष गाडवे,नारायण जानकर,बापू लोंढे आदी मान्यवरांसह गुरसाळे कारुंडे मोरोची कुरबावी नातेपुते पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊन समाजामध्ये वेगळा आदर्श निर्माण केलेला होता थोरले अण्णा उत्कृष्ट बागायतदार आहे दत्तात्रय व ज्ञानेश्वर पदवीधर इंजिनियर असून उद्योग व्यवसायामध्ये उत्तुंग भरारी घेतलेली आहे आई-वडिलांचे काबाडकष्ट कायम लक्षात राहावे यासाठी शेळके परिवार यांनी स्वर्गीय विठोबा शेळके यांच्या स्मृती अनोख्या पद्धतीने जपलेल्या आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
JBIyTQMuleXBfqxP
Ищите в гугле