आज माळशिरस तालुक्यातील थेट जनतेतील सरपंच पदासाठी ५८ तर सदस्य पदासाठी ३४४ अर्ज दाखल
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतीच्या थेट जनतेतील सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. दि. २८/११/२०२२ पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत. सदरची निवडणूक प्रक्रिया तहसीलदार जगदीश निंबाळकर, निवासी नायब तहसीलदार तुषार देशमुख, नायब तहसीलदार आशिष सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. गावनिहाय सरपंच पदासाठी ५८ तर सदस्य पदासाठी ३४४ अर्ज दाखल झालेले आहेत.
दि. ०१/१२/२०२२ रोजी आनंदनगर येथे सदस्य पदासाठी १०, वेळापूर येथे सदस्य पदासाठी ३ तर सरपंच पदासाठी ३, धानोरे येथे सरपंच पदासाठी १, नेवरे येथे सदस्य पदासाठी १६ तर सरपंच पदासाठी ४, जांभूड येथे सदस्य पदासाठी ३ तर सरपंच पदासाठी १, माळेवाडी (बो.) येथे सदस्य पदासाठी २२ तर सरपंच पदासाठी ४, पानीव येथे सदस्य पदासाठी १८ तर सरपंच पदासाठी ४, उंबरे दहीगाव येथे सदस्य पदासाठी १४ तर सरपंच पदासाठी १, निमगाव येथे सदस्य पदासाठी १६ तर सरपंच पदासाठी १, मारकडवाडी येथे सदस्य पदासाठी ११ तर सरपंच पदासाठी २, मेडद येथे सदस्य पदासाठी १२ तर सरपंच पदासाठी १, पिसेवाडी येथे सदस्य पदासाठी १३ तर सरपंच पदासाठी २, तामशिदवाडी येथे सदस्य पदासाठी ३, खंडाळी दत्तनगर येथे सदस्य पदासाठी ७, संगम येथे सदस्य पदासाठी ३ तर सरपंच पदासाठी १, सदाशिवनगर येथे सदस्य पदासाठी २, तरंगफळ येथे सदस्य पदासाठी ११ तर सरपंच पदासाठी २, मोटेवाडी येथे सदस्य पदासाठी २, यशवंतनगर येथे सदस्य पदासाठी २९ तर सरपंच पदासाठी २, लोंढे मोहितेवाडी येथे सदस्य पदासाठी ८ तर सरपंच पदासाठी ३, कचरेवाडी येथे सदस्य पदासाठी ४ तर सरपंच पदासाठी १, तीरवंडी येथे सदस्य पदासाठी १७ तर सरपंच पदासाठी ४, चांदापुरी येथे सदस्य पदासाठी १५ तर सरपंच पदासाठी ४, पठाणवस्ती येथे सदस्य पदासाठी १७ तर सरपंच पदासाठी ३, इस्लामपूर येथे सदस्य पदासाठी १६ तर सरपंच पदासाठी ४, गुरसाळे येथे सदस्य पदासाठी १९ तर सरपंच पदासाठी ३, तांबेवाडी येथे सदस्य पदासाठी १ तर सरपंच पदासाठी १, पळसमंडळ येथे सदस्य पदासाठी १४ तर सरपंच पदासाठी १, फळवणी येथे सदस्य पदासाठी १८ तर सरपंच पदासाठी २, काळमवाडी येथे सदस्य पदासाठी २०, कोळेगाव येथे सदस्य पदासाठी २३ तर सरपंच पदासाठी ४ असे एकूण यादिवशी सदस्य पदासाठी ३४४ तर सरपंच पदासाठी ५८ उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत.
अजून २ तारखेपर्यंत मुदत शिल्लक राहिली आहे. नवीन अपडेट रोज जाणून घेवूयात.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
I appreciate the humor in your analysis! For those interested, here’s more: FIND OUT MORE. What do you think?