श्रीमती पारूबाई बाबा सप्रे यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन….

पुणे विभागीय सेवानिवृत्त कृषी सह संचालक दादाराम सप्रे यांना मातृषोक…
श्रीगोंदा (बारामती झटका)
श्रीमती पारूबाई बाबा सप्रे यांचे रविवार दि. 22 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 5.00 वा. वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे. पुणे विभागीय सेवानिवृत्त कृषी सह संचालक दादाराम सप्रे व भाऊसाहेब सप्रे यांच्या मातोश्री होत्या. अंत्यविधी आजच 22 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता पिंपळे वस्ती जवळ, श्रीगोंदा-घोडेगाव रोड, श्रीगोंदा येथे होणार आहे.
श्रीमती पारूबाई यांचा सुसंस्कृत स्वभाव असून त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या. गावामध्ये व नातेवाईक यांच्यामध्ये त्यांच्या शब्दाला किंमत होती. त्या आदर्शवत जीवन जगल्या. त्यांच्या दुःखद निधनाने सप्रे परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे.

सप्रे परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो व पारूबाई यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच श्रीनिवास कदम पाटील परिवार व बारामती झटका वेब पोर्टल आणि युट्युब चॅनल यांचे कडून भावपूर्ण आदरांजली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.