ताज्या बातम्याशैक्षणिक

लोकनेते कै. ॲड. जयसिंगराव जाधव यांच्या जयंतीनिमित्त भव्य जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मळोली (बारामती झटका)

मळोली ता. माळशिरस, येथे प्रगत शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते कैलासवासी ॲड. जयसिंगराव (आबासाहेब) नारायणराव जाधव यांच्या ८५ व्या जयंतीनिमित्त भव्य जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन जनता विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मळोली येथे दि. १ व दिनांक २ ऑगस्ट २०२३ रोजी करण्यात आले आहे.

या स्पर्धेमध्ये बुधवार दि. २ ऑगस्ट रोजी इयत्ता १ ली ते ४ थी या विद्यार्थ्यांसाठी झाडाचे महत्व, माझे आई-बाबा, माझी शाळा, मला पंख असते तर…, मी मोबाईल झालो असतो तर…, असे विषय आहेत. यासाठी प्रथम पारितोषिक शिवप्रेमी गणेशोत्सव मंडळ मळोली, द्वितीय पारितोषिक इंजिनियर सोमनाथ माणिक काळे, तृतीय पारितोषिक ज्ञानेश्वर जाधव तर उत्तेजनार्थ कल्याण बाबर सर यांच्यावतीने देण्यात येणार आहे. यामध्ये प्रथम क्रमांकासाठी ११११ रु. सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकासाठी ७५१ रु., सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तृतीय क्रमांकासाठी ५५१ रु., सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तर उत्तेजनार्थ ३५१ रुपये व प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप आहे.

मंगळवार दि. १ ऑगस्ट रोजी इयत्ता ५ वी ते ७ वी च्या विद्यार्थ्यांना स्वाभिमानी व्यक्तिमत्व कै. ॲड. जयसिंगराव (आबासाहेब) जाधव, शेतकरी संपावर गेला तर…, संतांची शिकवण, छ. संभाजी महाराज – स्वराज्याचा अभिमान, माझ्या आवडत्या व्यक्तीचे चरित्र (हयात किंवा स्वर्गीय) असे विषय आहेत. यासाठी प्रथम पारितोषिक रणजीतबापू युवा फाउंडेशन, अध्यक्ष मोहित जाधव, द्वितीय पारितोषिक पोपट आप्पासो काळे पाटील, तृतीय पारितोषिक कल्याण बाबर सर आणि उत्तेजनार्थ हरी नारायण जाधव यांच्या वतीने देण्यात येणार आहे. यामध्ये प्रथम पारितोषिक २१११ रु., सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय पारितोषिक ११११ रु., सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय पारितोषिक ७५१ रु., सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तर उत्तेजनार्थ ५५१ रु. व प्रमाणपत्र असे स्वरूप असणार आहे.

मंगळवार दि. १ ऑगस्ट रोजी आठवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांना अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेला भारत देश, पर्यावरण सुरक्षा म्हणजेच जीवन सुरक्षा, प्रसारमाध्यमे विद्यार्थ्यांना बिघडवतात का ?, फॅशनमध्ये हरवली आईच्या पदराची उब, कोरोनामुळे माणसाची माणुसकी बदलली का ?, असे विषय आहेत. यासाठी प्रथम पारितोषिक रणजितसिंह जाधव मित्र मंडळ मळोली, द्वितीय पारितोषिक शिवप्रेमी गणेशोत्सव मंडळ मळोली, तृतीय पारितोषिक जय भवानी नवरात्र उत्सव मंडळ मळोली तर उत्तेजनार्थ संभाजी जगन्नाथ जाधव यांच्या वतीने देण्यात येणार आहे. यामध्ये प्रथम पारितोषिक ३१११ रु., सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक २१११ रु., सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक ११११ रु., सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तर उत्तेजनार्थ ५११ रु. व प्रमाणपत्र असे स्वरूप असणार आहे.

बुधवार दि. २ ऑगस्ट रोजी खुला गट यासाठी सावधान ! लोकशाहीत निष्ठा व्यस्त होत आहे का ?, महिलांना आरक्षण नको तर संरक्षण द्या, बाबा कार नको संस्कार द्या, जय जवान जय किसान, भ्रष्टाचाराच्या किडीवर कोणते कीटकनाशक फवारावे ?, असे विषय असणार आहेत. यासाठी प्रथम पारितोषिक फ्लोरा फर्निचर उद्योग समूह नातेपुतेचे मोहित जाधव, द्वितीय क्रमांक मधुकर सावंत सर, तृतीय क्रमांक मळोली चे उपसरपंच ॲड. महादेव पवार तर उत्तेजनार्थ मळोलीचे माजी सरपंच गणेश जाधव पाटील यांच्या वतीने देण्यात येणार आहे. यामध्ये प्रथम क्रमांक ५१११ रु., सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक ४१११ रु., सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांकासाठी ३१११ रु., सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तर उत्तेजनार्थ साठी २१११ रु., सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे स्वरूप असणार आहे.

भव्य जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा गुरुवार दि. ३ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० वा‌. होणार आहे. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी तानाजी लवटे ८२७५३०३१५२, अभिजीत जाधव ९८६०५४७६४२, पृथ्वीराज जाधव ९९७५७५५९०१, विजय झुरूळे ९५४५४८६४६४, निलेश जाधव ९८२२२२४८३९ यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort