वाघोली येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त महिला आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
वाघोली (बारामती झटका)
मौजे वाघोली येथे सेवा पंधरवडा अंतर्गत दि. २ ऑक्टोंबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत वाघोली यांच्यावतीने महिला आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. यामध्ये महिला, गर्भवती महिला व किशोरवयीन मुली यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.


सदर शिबिरात अकलूजचे सुप्रसिद्ध स्त्रिरोग तज्ञ डॉ. सौ. अर्चना गवळी व डॉ. सचिन गवळी यांनी तपासणी केली. यावेळी गावातील ४४ महिलांची तपासणी करण्यात आली. सदर शिबिरात डॉ. सौ. गवळी मॅडम यांनी महिलांना सल्ला आणि मोलाचे मार्गदर्शन केले. सदर शिबिरात गावातील डॉ. श्री. सुरेंद्र मिसाळ, डॉ. रेड्डी आणि वाघोली गावातील आरोग्य उपकेंद्रातील सीएचओ, आरोग्य सेविका आणि आशा वर्कर्स यांचे सहकार्य लाभले.

सदर शिबिरात ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंच सौ. वृशाली योगेश माने-शेंडगे, उपसरपंच पंडित विठ्ठल मिसाळ, ग्रामपंचायत सदस्य योगेश माने-शेंडगे, सौ. छाया पाटोळे सौ. सुजाता मिसाळ, सौ. रोहिणी मिसाळ, लक्ष्मण पारसे, अविनाश गाडे गावातील ग्रामस्थ आदी उपस्थित होते. सदर शिबिराचे ग्रामपंचायत कर्मचारी यांनी नियोजन केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

