Uncategorized

शंकरराव मोहिते पाटील चॅरिटेबल हॉस्पिटल ट्रस्ट शंकरनगर जमीन विक्रीची धर्मदाय आयुक्तकडून नोटीस जाहीर.

4 कोटी 10 लाख 87 हजार 200 रुपयांसाठी 3 हेक्टर 19 आर व पोट खराब 26 आर जमिनीची जाहीर नोटीस प्रसिद्ध

पुणे ( बारामती झटका )

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय पुणे विभाग पुणे यांचेकडून महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 चे कलम 36 (1)(3) अन्वये शंकरराव मोहिते पाटील चॅरिटेबल हॉस्पिटल ट्रस्ट शंकरनगर, ता. माळशिरस या ट्रस्टची मिळकत मौजे यशवंतनगर, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथील जमीन गट नंबर 3/1/ अ यांचे एकूण क्षेत्र 3 हेक्टर 19 आर व पोटखराब 26 आर या मिळकतीचे मूल्यांकन अहवाल दि. 15/9/2022 नुसार विक्रीची परवानगी मागितलेल्या मिळकतीचे मूल्य 4,10,87,200 ( चार कोटी दहा लाख सत्याऐंशी हजार दोनशे रुपये) दर्शविलेली आहे. त्यामुळे सदर रकमेपेक्षा कमी दराने निविदा भरू नये असे अधीक्षक (‘न्यास ) धर्मदाय सह आयुक्त दोन कार्यालय पुणे यांनी दि. 23/09/2022 रोजी जाहीर नोटीस दिलेली आहे.

सदरची नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत सदरची वर्णन केलेली स्थावर मिळकत विक्री करावयाची आहे‌. त्याकरिता सिल बंद निविदा मागविण्यात येत आहे. निविदा धारकांनी उपरोक्त नमूद कार्यालयाच्या पत्त्यावर निविदा पाठवाव्यात‌. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या सीलबंद निविदा दि. 28/10/2022 रोजी दुपारी 3 वाजता धर्मदाय सह आयुक्त पुणे विभाग पुणे यांचे जालनात सर्व समक्ष निविदा उघडण्यात येतील. निविदा फॉर्म भरणार यांनी निवेदित कोणत्याही प्रकारच्या अटी व शर्ती घालू नयेत. अटी व शर्ती घातलेल्या निविदा विचारात घेण्यात येणार नाहीत. निविदा धारकांनी निवेदित जी रक्कम लिहिली असेल त्या रकमेच्या 20% रकमेचा डीडी अथवा पे ऑर्डर न्यासाचे नावे निविदेसोबत देणे बंधनकारक राहील.

सर्व निविदा धारकांनी दि. 28/10/2022 उपरोक्त नमूद दालनात हजर राहावे. जालनात सर्व समक्ष निविदा उघडल्यानंतर हजर असणाऱ्या निविदा धारकाला आपली बोली वाढविण्यासाठी संधी देण्यात येईल. सर्वात जास्त बोली असलेल्या निविदा धारकांची निविदा उघडण्यात येईल. निविदा धारकास बोलीच्या फरकेची रक्कम अनामत रकमेचा डीडी पे शी ऑर्डर न्यासाच्या नावाने धर्मदाय आयुक्त यांचे आदेशाप्रमाणे दिलेल्या मुदतीत कार्यालयात जमा करावा लागेल. धर्मदाय आयुक्त यांचा निर्णय सर्वांवर बंधनकारक राहील‌. नमूद मिळकत विक्री करण्यास परवानगी देणे अथवा नाकारणे याबाबत संपूर्ण अधिकार धर्मदाय आयुक्त यांचा राहील.

सदर रकमेपेक्षा कमी रक्कम असलेली निविदा भरू नये. जर निविदा धारकांनी सदर रकमेपेक्षा कमी रकमेची निविदा भरली तर तशा निविदा विचारात घेतल्या जाणार नाहीत‌. सदरच्या निविदेचे अर्ज हे शंकरराव मोहिते पाटील चॅरिटेबल हॉस्पिटल ट्रस्ट शंकरनगर, ता. माळशिरस येथे उपलब्ध आहेत, अशी नोटीस सही शिक्यानिशी दिलेली आहे.

यशवंतनगर-अकलूज भागात साडेआठ एकर जमीन वॉल कंपाऊंड असणारी मिळकत घेण्याकरता अनेक लोक सहभागी होतील. कारण अकलूजमधील प्लॉटचे रेट पाहता सदरची मिळकत प्लॉटिंग करून विकल्यानंतर दहा कोटीच्या आसपास विक्रीतून पैसे मिळू शकतात. दीपावली झाल्यानंतर भाऊबीज दिवशी सदरच्या जमीनची बोली होऊन पुण्यामध्ये जमिनीचा मालक कोण होणार, याकडे माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort