Uncategorizedताज्या बातम्याराजकारण

सदाशिवनगर ग्रामपंचायतचे थेट जनतेतील सरपंच पदाचे उमेदवार माणिक सुळे पाटील यांच्या प्रचाराचा धुमधडाक्यात शुभारंभ

आ. रणजीतसिंह विजयसिंह मोहिते पाटील ग्रामविकास पॅनल सदाशिवनगर पॅनलचा थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या प्रचाराचा श्रीफळ वाढवून शुभारंभ…

सदाशिवनगर ( बारामती झटका )

सदाशिवनगर ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2022 रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे. आमदार रणजीतसिंह विजयसिंह मोहिते पाटील ग्रामविकास सदाशिवनगर या पॅनलच्या लोकनियुक्त थेट जनतेतील सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या प्रचाराचा शनिवार दि. 10/12/2022 रोजी सकाळी 10 वाजता मोठ्या थाटामाटात व उत्साही वातावरणात शुभारंभ पार पडलेला आहे.

माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या सदाशिवनगर येथील कारखाना स्थळावरील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. गावातील महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून ग्रामदैवतांचा आशीर्वाद घेऊन प्रचाराचा श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक यांच्यासह गावातील नेते कार्यकर्ते व युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार रणजीतसिंह विजयसिंह मोहिते पाटील ग्रामविकास सदाशिवनगर पॅनलमधून थेट जनतेतील सरपंच पदाचे उमेदवार माणिक सोपान सुळे पाटील, वार्ड क्रमांक 1 रमाबाई किसन बनसोडे, आनंद भागवत ओवाळ, आशा तानाजी पालवे, वार्ड क्रमांक 2 उद्धव बापू धाईंजे, नंदिनी मल्हारी भुजबळ, नारायण ज्ञानेश्वर सालगुडे पाटील, वार्ड क्रमांक 3 बाळासाहेब महादेव मोहिते, शाबिरा मगदूल मुलाणी, वार्ड क्रमांक 4 रंजना गंगाराम धाईंजे, योगिता गोरक्षनाथ पालवे, सुभाष वसंत सालगुडे असे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य पदाचे उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. सरपंच पदाचे उमेदवार यांचे चिन्ह शिट्टी तर पॅनलमधील सदस्यांना ऑटो रिक्षा, बॅट आणि कपाट अशी चिन्हे मिळालेली आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button