Uncategorizedताज्या बातम्या

सहकार महर्षीपासून पिसेवाडी, वेळापूर परिसरातील निष्ठावान राजकीय व सामाजिक क्षेत्रातील आदर्श घराणे…

तीन पिढ्या एकत्र राहून, एकत्र कुटुंब पद्धतीचे ग्रामीण भागातील माणुसकी जपणारे घराणे…

ग्रामीण राजकारणातील अस्सल हिरा, मानाचा तुरा सर्वच क्षेत्रात चौरंगी चिरा असणाऱ्या युवकाचा राजकारणातील चढता आलेख.

वेळापूर ( बारामती झटका )

सरकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या राजकारणापासून पिसेवाडी, वेळापूर परिसरातील स्वर्गीय तायाप्पा पिसे यांचे निष्ठावान राजकीय व सामाजिक क्षेत्रातील आदर्श घराणे आहे. त्यांच्या पश्चात तीन पिढ्या एकत्र राहून एकत्र कुटुंब पद्धतीचे ग्रामीण भागातील माणुसकीचे नाते जपणारे घराणे आजही आहे. अशा घराण्यातील ग्रामीण राजकारणातील अस्सल हिरा मानाचा तुरा सर्वच क्षेत्रात चौरंगी चिरा असणाऱ्या युवकाचा राजकारणातील चढता आलेख पहावयास मिळत आहे. शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघ विझोरी, अकलूज हा संघ माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील, विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे संघटन महामंत्री शिवामृत दूध संघाचे विद्यमान चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील यांनी माळशिरस तालुक्यातील युवकांना संचालक पदाची संधी दिलेली आहे. त्यामध्ये पिसेवाडीचे युवा नेते सुरेशराव महादेव पिसे यांना नूतन संचालक पदाची संधी मिळालेली आहे.

पिसेवाडी, वेळापूर येथील स्व. तायाप्पा पिसे यांच्यापासून मोहिते पाटील परिवार यांच्याशी एकनिष्ठ व प्रामाणिकपणे राजकारणात आणि समाजकारणात कायम सहकार्य असणारे घराणे आहे. स्व. तायप्पा यांना चार मुले, भाऊसाहेब, लिंबाजी, महादेव व रामचंद्र. त्यापैकी महादेव पिसे समाजकार्य आणि राजकारणामध्ये होते. पूर्वीच्या काळी पिसेवाडी वेळापूर ग्रामपंचायतमध्ये गाव होते. 1989 साली पिसेवाडी स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात आली. 1992 ला पहिल्यांदा पिसेवाडी ग्रामपंचायतची निवडणूक झाली. त्यामध्ये महादेव पिसे ग्रामपंचायत सदस्य होते. त्यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य मदनसिंह मोहिते पाटील यांच्या सहकार्याने गावात अनेक विकास कामे केलेली होती. पूर्वीच्या काळी शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय केला जात असे. त्यामुळे महादेव पिसे यांनी 1986 साली तत्कालीन कर्तव्यदक्ष चेअरमन राजसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाघजाई दूध संस्थेची स्थापना केली. यामुळे पिसेवाडी परिसरातील दुग्ध व्यवसायिकांची अडचण दूर झाली होती.

घरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील लहानपणापासून बाळकडू मिळालेले सुरेशराव पिसे यांनी घराण्याचा राजकीय वारसा जपला. बारावीपर्यंत लिहिण्या-वाचण्याकरता शिक्षण घेऊन पिसेवाडी ग्रामपंचायतचे 2002 साली तरुण वयात सरपंच पदाची धुरा सांभाळलेली होती. त्यानंतर 2007 साली दुसऱ्यांदा सरपंच झाले. पिसेवाडी गावातील अनेक लोकांच्या हिताच्या योजना राबविण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील व माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या सहकार्याने पिसेवाडी गावचा चेहरा मोहरा बदललेला होता. पिसेवाडी आणि मदनदादा आणि अर्जुनदादा यांचे वेगळे नाते निर्माण झालेले होते. पिता-पुत्रांनी पिसेवाडी गाव विकासासाठी दत्तक घेतल्यासारखे होते. त्यामुळे गावातील नागरिक मदनदादा व अर्जुनदादा पिता-पुत्रांचा शब्द प्रमाण मानत.

सात ते आठ वर्ष सरपंच पदाची धुरा सांभाळत असताना सुरेशराव पिसे यांनी कोणत्याही आमिषाला भूलथापेला अथवा प्रलोभनाला बळी न पडता आपल्या घराण्याची निष्ठा व परंपरा मोहिते पाटील यांच्याशी कायम जपलेली आहे. 2012 साली वाघजाई दूध संस्थेच्या चेअरमन पदाची धुरा वडिलांच्या मृत्यूनंतर आलेली होती. स्व. महादेव पिसे यांनी घालून दिलेल्या आदर्शावर सुरेशराव पिसे यांची वाटचाल सुरू आहे. घरामध्ये वडील व तीन चुलते मयत आहेत. घरामध्ये सर्व मिळून पाच भाऊ आहेत. तिसऱ्या पिढीत सुद्धा अजून एकत्र कुटुंब आहे. वेळापूर पिसेवाडी परिसरामध्ये आदर्श असणारे कुटुंब आहे.

सुरेशराव पिसे यांच्या घरातील भावाची व स्वतःची मुले शिक्षणामध्ये अग्रेसर आहेत. सुरेशराव पिसे यांची कन्या कु. कार्तिकी हिने दहावीच्या परीक्षेमध्ये इंग्लिश स्कूल, वेळापूर येथे 93% मार्क्स मिळवून शाळेत पहिली आलेली होती. बारावीच्या परीक्षेत शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज यांच्या माळशिरस तालुक्यातील सर्व शाळेमध्ये पहिली आलेली होती, तिला 93% मार्क्स पडले होते. सध्या ती बी टेक करीत आहे. पिसे परिवार यांचा पहिल्यापासून शेती व दुग्ध व्यवसाय आहे. शेतामध्ये डाळिंब, सिताफळ, ऊस व अन्य पिके घेतली जातात. सर्व परिवार एकत्रित मिळून मिसळून गुण्या गोविंदाने नांदत आहे.

वेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांनी रणनीती आखून सोसायटीमध्ये विरोधकांना चारीमुंड्याचीत केलेले होते. यामध्ये सुरेशराव पिसे यांनी माळी समाजामध्ये एकसंघता ठेवून मोहिते पाटील यांच्या विचारांची असणाऱ्या सोसायटीला मदत केलेली होती. तेव्हापासून धैर्यशील मोहिते पाटील यांना सुरेशराव पिसे यांच्या कार्याची चुणूक दिसलेली होती. शिवामृत संघामध्ये नूतन चेहरे व निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी दिलेली आहे. त्यामध्ये पिसेवाडी, वेळापूर परिसरातील युवा नेते सुरेशराव पिसे यांची वर्णी लागलेली आहे.

वेळापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अनेक वर्ष भव्य जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित केले जाते. यामध्ये सुरेशराव पिसे यांचा सिंहाचा वाटा असतो. पिसेवाडी, वेळापूरमध्ये महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी, सार्वजनिक कार्यक्रम सण उत्सव यामध्ये नेहमी सहभाग असतो. स्वच्छ आचारविचार, साधी राहणी, उच्च विचार असे असणारे उंचीला कमी परंतु समाजामध्ये कार्यातून स्वतःची उंची वाढविलेले युवा नेते सुरेशराव पिसे यांची शिवामृत दूध संघाच्या नूतन संचालक पदी निवड झाल्याबद्दल अनेक स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button