सोलापूर कृषि महोत्सव – २०२३ परिसंवाद, चर्चासत्र, कृषि प्रदर्शन, स्पर्धा, सन्मान बरेच काही !!
सोलापूर (बारामती झटका)
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात महाराष्ट्र मिलेट मिशेन २०२३, आंतराष्ट्रीय तृणधान्य वर्षे २०२३, भारत G 2 -2023 चे औचित्य साधून जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सोलापूर व प्रकल्प संचालक आत्मा सोलापूर यांचे संयुक्त विद्यमाने सोलापूर कृषि महोत्सव – २०२३ दि. ५ मार्च ते दि. ९ मार्च २०२३ या कालावधीत लक्ष्मीविष्णू मील प्रागंण, मरिआई चौक, सोलापूर येथे आयोजीत केला आहे. या महोत्सवाचे उदघाटन जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महसुल मंत्री पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय यांचे हस्ते दि. ५ मार्च रोजी सकाळी ९.०० वा होणार आहे.
सदर कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व सन्मायीय आजी माजी खासदार, आमदार उपस्थितीत राहणार आहेत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, विभागीय कृषि सहसंचालक रफीक नायकुडे, कृषि संचालक विकास पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात दि. ५ मार्च ते दि. ९ मार्च या कालावधीत सकाळी ११ ते ४ वाजेपर्यत मान्यवरांची विषयतज्ञ यांची परिसंवाद व्याख्यान चर्चासत्र आयोजीत केली आहेत. याचबरोबर मिलेट महोत्सव व पाककला स्पर्धा, महिला शेतकरी व पीकस्पर्धा विजेते, विविध पुरस्कार विजेतेचा खास करून दि. ९ मार्च रोजी सन्मान मान्यवरांच्या हस्ते आयोजीत केला आहे.

याचबरोबर विक्रेता व खरेदीदार संमेलन, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री, गृहउपयोगी वस्तू दालन, खाद्य पदार्थ दालन इत्यादीचे भरगच्च नेटके नियोजन व आयोजन केले आहे. यामध्ये सहभाग नोंदवून लाभ घेण्याचे आवाहन बाळासाहेब शिंदे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सोलापूर व मदन मुकणे, प्रकल्प संचालक आत्मा सोलापूर यांनी केले आहे.
मंडळ कृषि अधिकारी नातेपुते कार्यक्षेत्रातील २६ गावांमधून २६ उत्कृष्ट पीक नमुने व २४ लाभार्थी महोत्सवात पाठविण्याचे नियोजन केले आहे. तरी पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांनी प्रदर्शन, सन्मान, व्याख्यान, परिसंवाद, चर्चासत्र या अलभ्य लाभ व दुग्धशर्करा योगाचा लाभ घेण्याचे आवाहन सतिश कचरे, मंडळ कृषि अधिकारी, नातेपुते यांनी केले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng