स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पाठपुराव्याला यश, वाहनधारकांच्या अपघाताचे प्रमाण घटणार..
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील विझोरीपाटी शेजारील अकलूज रस्ता मृत्यूचा सापळा बनलेला होता..
विझोरी (बारामती झटका)
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी महामार्गावर पुणे-पंढरपूर रोडवर माळशिरस तालुक्यातील निमगावपाटी शेजारी अकलूज रस्ता मृत्यूचा सापळा बनलेला होता. अनेक वाहनधारकांचे वारंवार अपघात होऊन अनेक लोकांना शरीराचे अवयव गमवावे लागून आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष आंदोलनवीर अजितभैया बोरकर यांनी पालखी महामार्गाचे प्रकल्प संचालक श्री. घोडके साहेब यांच्याशी संपर्क करून अपघाताच्या ठिकाणी बेकायदेशीर असणारा रस्ता त्वरित बंद करावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिलेला होता. दोन तासात प्रकल्प संचालक श्री. घोडके साहेब यांनी बांधकाम विभागाचे अधिकारी पाठवून सदरचा रस्ता त्वरित बंद करून घेतलेला होता.
त्यावेळेस आरोग्य दूत व माणसातील देव डॉ. सचिन शेंडगे उपस्थित होते. त्यांनी रस्ता बंदसाठी मुरूम टाकून घेतलेला होता. तरी परंतु वाहनधारक मुरमावरून पुणे-पंढरपूर रस्त्यावरून अकलूजकडे जात होते. यामुळे पुन्हा आंदोलनवीर अजित बोरकर यांनी श्री. घोडके साहेब यांच्याशी संपर्क साधून सदरच्या ठिकाणी कायमस्वरूपी रस्ता बंद करण्यासाठी सिमेंट काँक्रेटमध्ये डिव्हायडर तयार करण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे सिमेंट काँक्रेट डिव्हायडर झालेले आहेत. त्यामुळे वाहनधारकांचे अपघाताचे प्रमाण घटणार आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाठपुरावा केला असून या पाठपुराव्याला यश आलेले असल्याने वाहनधारकांमधून व जनतेमधून समाधान व्यक्त केले जात आहे. तरी वाहनधारकाने पंढरपूर वेळापूरच्या दिशेने येणाऱ्या पुलाच्या खालून न जाता डाव्या बाजूने पुलावर येऊन नंतर उजव्या बाजूने अकलूजकडे गेल्याने महामार्गाचा व अपघाताचा संबंध येत नाही. तरी, वाहनधारकांनी नियमाचे पालन करावे, असे आवाहन आंदोलनवीर अजितभैया बोरकर व डॉ. सचिन शेंडगे यांनी सर्व वाहनधारक व नागरिकांना आवाहन केलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng