नातेपुते पोलीस स्टेशन हद्दीत 02 लाख 52 हजार 100 रु. रकमेचे जुगार अड्ड्यावर धडक कारवाई करून 13 आरोपी व मुद्देबाल जप्त करण्यात आला…

अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोर पाटील कारवाईच्या ॲक्शन मूडमध्ये अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले…
नातेपुते (बारामती झटका)
उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे हद्दीत निरा उजवा कॅनॉल जवळ हनुमंत लाळगे यांचे पत्र्याच्या शेडमध्ये 52 पानाचा पत्याचा खेळ खेळत असलेले 13 लोक, जुगार साहित्य व मुद्देमाल दोन लाख 52 हजार 100 रु. किमतीचे जुगार साहित्य, मोटार सायकलसह जप्त करून नातेपुते पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार अधिनियम 1887 चे कलम 12 (अ) प्रमाणे प्रसाद दिलीप सूर्यवंशी बक्कल नंबर 383 नेमणूक माळशिरस पोलीस स्टेशन येथे यांनी फिर्याद दाखल केलेली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोर पाटील यांच्या स्पेशल पथकाने जुगार अड्ड्यावर धडक कारवाई केलेली असल्याने अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोर पाटील कारवाईच्या ॲक्शन मूडमध्ये असल्याने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी उपअधीक्षक डॉ. सई भोर पाटील यांच्या पथकातील प्रसाद दिलीप सूर्यवंशी बक्कल नंबर 383 माळशिरस पोलीस ठाणे नेमणूक, पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल शिंदे बक्कल नंबर 16 59 वेळापूर पोलीस स्टेशन नेमणूक, पोलीस कॉन्स्टेबल मुटकुळे बक्कल नंबर 801, पोलीस कॉन्स्टेबल शेख बक्कल नंबर 2058 नातेपुते पोलीस ठाणे नेमणूक यांनी हनुमंत लाळगे यांच्या शेतामध्ये प्रमोद विलास कदम (रा. वालचंदनगर), सिद्धार्थ दिलीप मिसाळ (रा. वालचंदनगर), निरंकार अमोल भुजबळ (रा. धर्मपुरी), विशाल उर्फ विपुल दिलीप लोंढे (रा. वालचंदनगर), सुरेश कोंडीबा सावंत (रा. मांडवे), हनुमंत किसन नरूटे (रा. तामशीदवाडी), संतोष किसन काळे (रा. नातेपुते), विशाल प्रकाश गायकवाड (रा. सिद्धार्थनगर, बारामती), सोमेश्वर विजयकुमार जंगम (रा. शिंगणापूर), महेंद्र उर्फ महेश मारुती पोळ (रा. शिंगणापूर), अनिल भगवान गोफणे (रा. धर्मपुरी), बजरंग किसन सावंत (रा. उद्धट), ज्ञानेश्वर नारायण पिसे (रा. नातेपुते) यांच्यासह रोख रक्कम 52 हजार 100 व आठ मोटरसायकली दोन लाख रुपये किमतीच्या असा 02 लाख 52 हजार 100 रुपये मुद्देमालासह नातेपुते पोलीस स्टेशन येथे कायदेशीर फिर्याद दिलेली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng