ताज्या बातम्यासामाजिक

संस्कृतीताई यांनी आपुलकी, प्रेम, जिव्हाळा व विश्वासाची नाती निर्माण केली.

सदाशिवनगर येथील ओम साई निवासस्थानी गौरी गणपती निमित्त अध्यात्म व सुसंस्कृत लक्ष्मीचे आगमन…

सदाशिवनगर (बारामती झटका)

सदाशिवनगर ता. माळशिरस येथील सुज्ञे परिवार यांच्या ओम साई निवासस्थानी गौरी गणपतीनिमित्त अध्यात्मिक व सुसंस्कृत लक्ष्मीप्रमाणे असणाऱ्या सौ. संस्कृतीताई राम सातपुते यांनी सदिच्छा भेट देऊन आपुलकी, प्रेम, जिव्हाळा व विश्वासाचे घट्ट नाते निर्माण केलेले आहे. याचा प्रत्यय सदिच्छा भेटीमधून सुज्ञे परिवार यांना आलेला आहे. यावेळी श्रीमती पार्वतीबाई विठ्ठल सुज्ञे, सौ. अनिता सुभाष सुज्ञे, कु. साक्षी सुभाष सुज्ञे, रसिका डुड्ड, सौ.भाग्यश्री जगदीश राजमाने, साईराज सुभाष सुज्ञे, यशराज जगदीश राजमाने, मयुरेश जगदीश राजमाने उपस्थित होते.

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या धर्मपत्नी सौ. संस्कृतीताई सातपुते आहेत. त्यांनी माळशिरस तालुक्यातील महिलांमध्ये आपुलकी, प्रेम, जिव्हाळा व विश्वासाचे घट्ट नाती निर्माण केले आहेत. माळशिरस तालुक्यातील महिलांशी गेल्या चार वर्षापासून संबंध आलेला आहे‌. लोकप्रिय आमदार राम सातपुते यांच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी प्रचारादरम्यान तालुक्यांमध्ये सोलापूर जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ. ज्योतीताई केके पाटील यांच्या समवेत प्रचारादरम्यान अनेकांच्या भेटीगाठी घेतलेल्या होत्या. त्या वेळेला राम आणि संस्कृती यांचा साखरपुडा झालेला होता. तरीसुद्धा त्यांनी होणाऱ्या पतीसाठी प्रचारात सहभागी होऊन अनेक महिलांची मने जिंकलेली होती. निवडणुकीनंतर राम सातपुते आमदार झाले. परंतु, संस्कृतीताई यांनी आमदाराची धर्मपत्नी म्हणून कधीही डोक्यामध्ये हवा जाऊ दिली नाही. सर्वसामान्य व सुसंस्कृत महिलांसारखी त्यांनी आपली वागणूक, बोलणे व साधी राहणीमान ठेवले आहे.

माळशिरस तालुक्यात अनेकांच्या धार्मिक, सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहत असतात. लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते मतदारसंघाच्या बाहेर असल्यानंतर सौ. संस्कृतीताई अनेकांच्या लग्न समारंभ व इतर कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असतात. सौ. संस्कृतीताई सातपुते यांच्यावर आई-वडिलांचे संस्कार, सासू-सासऱ्यांचा सहवास व पतीचे राजकीय वलय यांमधून संस्कृतीताई यांनी समाजामध्ये आपले वेगळे अस्तित्व निर्माण केलेले आहे. महिलांचा हळदी कुंकवाचा व उखाणे, गाणी असा कार्यक्रम घेऊन महिलांना हक्काचे व्यासपीठ निर्माण केलेले आहे. अनेक महिलांचा सहवास लाभल्यानंतर कितीतरी महिलांच्या व तरुणींच्या मनात संस्कृतीताई यांनी आपले स्वतःचे स्थान निर्माण केलेले आहे.

सदाशिवनगर येथील सुज्ञे परिवार आशा परिवारापैकी एक आहे. सौ. संस्कृतीताई सातपुते यांनी गौरी-गणपती निमित्त सदिच्छा भेट दिल्यानंतर सुज्ञे परिवार यांच्या आनंदाला पारावर उरलेला नव्हता. साधुसंत येती घरा, तोची दिवाळी दसरा, असा आनंद सुज्ञे परिवार यांना झालेला होता. मात्र, त्यासाठी लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते व सौ. संस्कृतीताई सातपुते यांनी जनतेमध्ये आपुलकी, प्रेम, जिव्हाळा व विश्वासाचे नाते निर्माण केलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button