ताज्या बातम्याराजकारणसामाजिक
वारजे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जाहीर सभेचे आयोजन
वारजे (बारामती झटका)
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी साहेब यांची वारजे येथील “विमल विद्या कुंज” व “शानू पटेल हायस्कूल” च्या न्याय हक्कासाठी मंगळवार दि. २६/०९/२०२३ रोजी सकाळी ११ वा. हायस्कूलच्या मैदानावरती जाहीर सभा होणार आहे. या सभेचे आयोजन स्वाभिमानी शेतकरी संघटना पुणे जिल्हा शहर यांच्यावतीने करण्यात आले आहे.
तरी या जाहीर सभेसाठी सर्व पालक, विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng