अकलूजच्या आनंदी लीनेस क्लबने घेतली आईच्या मातृत्वाची दखल
संग्रामनगर (बारामती झटका) केदार लोहकरे यांजकडून
अकलूजमधील नवीन एसटी स्टँडमध्ये स्तनदा मातांसाठी आणि गरजू महिलांसाठी, महिला सुरक्षितता आणि सन्मान पर आनंदी लिनेस क्लबच्या महिलांच्या वतीने हिरकणी कक्षाची निर्मिती नुकतीच करण्यात आली आहे. त्यांचे उद्घाटन अकलूज पोलीस स्टेशनच्या पोलीस उप विभागीय अधिकारी डॉ. सई भोर पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
आज-काल महिला आपल्या लहान तान्ह्या लेकरांना घेवून घराबाहेर पडून आपल्या घरासाठी अनेक कामे प्रवास करत पार पाडत असतात. अशा वेळेला एसटी स्टँडवर बसची वाट पाहत थांबावे लागते. त्यावेळी लेकरांना भूक लागली असता. त्यांच्या मनाचा कोंडमारा होतो. ह्या गोष्टीची दखल घेऊन आनंदी लिनेस् क्लबच्या अध्यक्षा सौ. छाया बुराडे यांनी एसटी व्यवस्थापक व अधिकारी यांच्याशी चर्चा करून हिरकणी कक्षाची संकल्पना मांडली आणि सर्व खर्च लिनस क्लबमधील महिला उचलतील, अशी ग्वाही दिली.
आज प्रत्यक्षात हिरकणी कक्ष उभा करून त्याचे उद्घाटन प्रेरणादायी पोलीस उप विभागीय अधिकारी डॉ. सई भोर पाटील यांच्या शुभ हस्ते हस्ते करण्यात आले.
या उद्घाटनप्रसंगी अकलूज पोलीस स्टेशन नागझीन तांबोळी उपस्थित होत्या आणि आनंदी लिनेस क्लबमधील सर्व सदस्य महिला उपस्थित होत्या. आनंदी लिनेस क्लबच्या अध्यक्षा सौ. छाया बुराडे, सचिव राजश्री जगताप आणि खजिनदार सौ. विद्या गिरमे यांनी पोलीस उप विभागीय अधिकारी डॉ. सई भोर पाटील यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला. यावेळी उपस्थित एसटी महामंडळमधील अधिकारी यांचा सत्कार लिनेस् क्लबच्या वतीने करण्यात आला.
या कार्यक्रमाला उपाध्यक्ष सौ. संगीता दोशी, सदस्या सौ. सोनल शहा, सौ. विद्या गिरमे, सौ. संध्या जाधव, सपना गांधी, योगिता ओसवाल, स्नेहा गिरमे, हेमा माने, शोभा चंदनशिवे, मंजू पवार, मीना मगर आदी उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक छाया बुराडे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ. सुप्रिया मुदगल यांनी केले तर आभार सौ. राजश्री जगताप यांनी मानले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Insightful read! I found your perspective very engaging. For more information, visit: READ MORE. Eager to see what others have to say!