ताज्या बातम्याराजकारण

आ. श्रीकांतजी भारतीय यांनी भाजपच्या नूतन महिला जिल्हाध्यक्षा सौ. ज्योतीताई पाटील यांचा सन्मान केला.

भारतीय जनता पक्षाचे 2024 लोकसभा व विधानसभा महाविजय संयोजन प्रमुख आ. श्रीकांतजी भारतीय यांच्या निवासस्थानी श्री गणपती बाप्पाचे दर्शन ….

मुंबई (बारामती झटका)

लहानांपासून थोरांपर्यंत व खेड्यापासून शहरातील लोकांपर्यंत सर्वांचे श्रद्धास्थान असणाऱ्या गणपती बाप्पाचे आगमन 19 सप्टेंबर 2023 रोजी उत्साही व भक्तीमय वातावरणात झालेले होते. गणपती बाप्पाचे विसर्जन अनेक ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी केले जाते. कोणी दीड दिवसाचा तर काही ठिकाणी पाच दिवस, सात दिवस, दहा दिवस असे गणपती विसर्जन करीत असतात.

महाराष्ट्रामध्ये कोकण, पुणे, मुंबई या ठिकाणी गणपती उत्सवामध्ये सार्वजनिक व घरगुती राजकीय नेत्यांच्या गणपतींना विशेष महत्त्व असते. अनेक कार्यकर्ते राजकीय नेत्यांच्या घरी गणपतींचे दर्शन व राजकीय घडामोडी यासाठी सदिच्छा भेट देत असतात.

भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील 2024 निवडणुकीत 48 लोकसभा व 288 विधानसभा महाविजय संयोजन प्रमुख असणारे भारतीय जनता पक्षातील अनेक आमदारांच्या विजयाचे पडद्यामागील किंगमेकर असणारे भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार व माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांचे विशेष कार्य अधिकारी आमदार श्रीकांतजी भारतीय यांच्या निवासस्थानी श्री गणपती बाप्पाचे दर्शन सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या व सोलापूर ग्रामीण भारतीय जनता पक्षाच्या नूतन जिल्हाध्यक्षा सौ. ज्योतीताई केके पाटील यांनी निवासस्थानी सदिच्छा भेट दिल्यानंतर नूतन जिल्हाध्यक्षा सौ. ज्योतीताई पाटील यांचा सन्मान आमदार श्रीकांतजी भारतीय यांनी केला.

आमदार श्रीकांतजी भारतीय यांचा भाजपमध्ये कार्यकर्ता व नेता घडविण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष वाढीसाठी संधी दिली जाते. माळशिरस तालुक्यात भारतीय जनता पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते व अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष के. के. पाटील यांनी माळशिरस तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या वाढीमध्ये योगदान दिलेले आहे. के. के. पाटील यांनी माळशिरस समितीमध्ये तीन टर्म सदस्य पदावर काम केलेले आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत के. के. पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरलेली होती. त्यांना भारतीय जनता पक्षाने सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर संधी दिलेली असून भाजपचे प्रांतिक सदस्य व सोलापूर जिल्हा सहप्रभारी पदाची जबाबदारी आहे.

जिल्हा परिषद गट महिलांसाठी राखीव झाल्यानंतर सौ. ज्योतीताई केके पाटील यांनी दैदीप्यमान विजय संपादन करून जिल्हा परिषद गटामधील अनेक प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडलेली होती. काम करण्याची पद्धत, वक्तृत्व, एखाद्या प्रलंबित प्रश्नाचा निपटारा करण्यासाठी योग्य नियोजन असे अनेक राजकीय कौशल्य असणारे गुण ज्योतीताई यांच्याकडे आहेत. भारतीय जनता पक्षाने संघटन व वक्तृत्व या जोरावर ज्योतीताई पाटील यांच्याकडे भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्हा ग्रामीण महिला जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली आहे. विशेष म्हणजे ज्योतीताई यांच्याकडे जबाबदारी असणाऱ्या जिल्हाध्यक्ष कार्यक्षेत्रामध्ये माढा लोकसभा व माळशिरस, पंढरपूर, सांगोला, माढा आणि करमाळा विधानसभा मतदारसंघाचे विशेष प्रतिनिधित्व करावे लागणार आहे. सौ. ज्योतीताई पाटील यांनी श्रीकांतजी भारतीय यांच्या निवासस्थानी गणपती दर्शनानिमित्त सदिच्छा भेट दिली. त्यावेळेस त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. त्यावेळी श्रीकांतजी भारतीय व के. के. पाटील परिवारातील विश्वासू सहकारी असणारे लहू शिनगारे उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button