पिसेवाडी येथील सुसंस्कृत युवकाचा प्रामाणिकपणा सापडलेला मोबाईल परत केला.

‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’, वडिलांनी सापडलेला मोबाईल परत केलेला होता, त्याचीच पुनरावृत्ती सुसंस्कृत मुलाने केलेली आहे.
वेळापूर (बारामती झटका)
पिसेवाडी, ता. माळशिरस येथील आयआयपीएल बँक मॅनेजर शाखा अकलूज येथे कार्यरत असणारे सुसंस्कृत घराण्याचा वारसा जपणारे धनाजी नामदेव पिसे यांनी बारामती झटका चे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांचा मोबाईल माळशिरसहून वेळापूरकडे जात असताना मोटरसायकलच्या टाकीवरून गळून पडलेला होता. सदरचा मोबाईल पिसेवाडी येथील सुसंस्कृत युवकाला सापडल्यानंतर प्रामाणिकपणे सापडलेला मोबाईल संपादक श्रीनिवास कदम पाटील यांना परत केलेला आहे. धनाजी पिसे यांचे वडील नामदेव पिसे यांनासुद्धा मोबाईल सापडलेला होता. त्यांनी मोबाईल मालकाला परत केलेला होता. सुसंस्कृत वडिलांच्या मुलाने त्याचीच पुनरावृत्ती करून ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ यांच्या प्रामाणिकपणाचा प्रत्यय आलेला आहे.
माळशिरस तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकालाचे वार्तांकन करून संपादक श्रीनिवास कदम पाटील माळशिरस-वेळापूर मार्गे मळोली येथील घराकडे जात असताना खुडूस हद्दीत माळशिरस तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार भारत तात्या मगर यांना निवडणूक निकालाची माहिती पाठवली. त्यावेळेस निवडून आलेल्या सरपंचाचा फोन आलेला असल्याने मोठा मोबाईल टाकीवर ठेवलेला होता. लहान मोबाईलवर बोलत घराकडे मोटरसायकलवर जात असताना खुडूस-पिसेवाडी दरम्यान मोबाईल टाकीवरून गरंगळून रस्त्यावर पडलेला होता.

पाठीमागून पिसेवाडी गावातील धनाजी नामदेव पिसे हे आयआयएफएल बँकेत मॅनेजर अकलूजच्या शाखेत आहेत, तेही काम आटपून अकलूजवरून पिसेवाडीकडे येत असताना रस्त्यावर त्यांना गाडीच्या लाईटच्या उजेडात मोबाईल पडलेला दिसला. त्यांनी गाडी थांबवून मोबाईल हातामध्ये घेऊन प्रोफाइल चेक केल्यानंतर बारामती झटका असे पाहिल्यानंतर त्यांची खात्री झाली. संपादक श्रीनिवास कदम पाटील यांचा मोबाईल आहे. त्यांनी फोन करण्याचा प्रयत्न केला पण, फोन होऊ शकला नाही. इको बोर्ड या ठिकाणी गेल्यानंतर संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्या लक्षात आले टाकीवरील मोबाईल पडलेला आहे. सदर मोबाईलच्या नंबरला फोन केल्यानंतर पहिल्याच रिंगला धनाजी भिसे यांनी फोन उचलून, “नमस्कार कदम पाटील, मी पिसेवाडी मधील आहे. तुमचा मोबाईल मला सापडलेला आहे. सध्या मी पिसेवाडी पाटीजवळ आहे, मोबाईल घेऊन जावा. संपादक यांनी पिसेवाडी पाटीजवळ गेल्यानंतर धनाजी पिसे यांनी मोबाईल दिला. चर्चा करीत असताना त्यांनी आमच्या वडिलांना मोबाईल सापडलेला होता, तो सुद्धा आम्ही परत केलेला होता. खऱ्या अर्थाने सुसंस्कृत घरामध्येच असे सुसंस्कृत विचाराची माणसं असतात.
‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ वडिलांची पुनरावृत्ती मुलाने केलेली असल्याने पिसेवाडी येथील सुसंस्कृत युवकाचा सापडलेला मोबाईल परत केलेला असल्याने प्रामाणिकपणा व घराण्याचे संस्कार दिसून आलेले आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.