ताज्या बातम्यासामाजिक

सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज अजून किती जीव जाण्याची वाट पाहत आहे ???

पिलीव-माळशिरस रोडचे दोन आमदारांनी उद्घाटन करुनही काम सुरू नाही…

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस-पिलीव रस्ता गेली 25 ते 30 वर्षे झालेला नाही. नुसते खड्डे बुजवणे हेच एकमेव या रोडवरती काम केले जाते. परंतु गेल्या वर्षी माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते यांनी अंदाजे चोवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याचे टेंडरही केलेले आहे. टेंडर होऊनही बरेच दिवस झाले तरी अद्याप काम सुरू झालेले नाही. माळशिरस तालुक्याचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व विधानसभेचे आमदार राम सातपुते यांनी गेली वीस ते पंचवीस दिवसांपूर्वी या रस्त्याचे उद्घाटन करूनही नुसते कुठेतरी डागडुजी करून कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी लोकांच्या डोळ्याचे पाणी पुसण्याचे काम करीत आहे.

माळशिरस-पिलीव रोड हा दळणवळणाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा रोड मानला जातो. या रोडवरती मोटेवाडी, तरंगफळ, चांदापुरी, पिलीव अशी गावे आहेत. तर चांदापुरी साखर कारखाना, राजेवाडी साखर कारखाना व अन्य साखर कारखान्याची वाहतूक याच रोडवरून होत असते. सध्या साखर कारखाने चालू झालेले आहेत. रस्तावरून जात असताना मोठ्या प्रमाणात धूळ उडत असते. जेष्ठ नागरिक, लहान मुले यांना यापासून खूप धोका सहन करावा लागत आहे. माळशिरस येथे तरंगफळ, चांदापुरी, मोटेवाडी गावातून शेकडो मुले दररोज ये-जा करीत असतात. या अगोदर या रस्त्यावरती खूप अपघात झालेले आहेत. बऱ्याच जणांनी आपले जीवही गमावले आहेत. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभाग अजूनही काम चालू करत नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग अजून किती लोकांचा जीव घेण्याची वाट पाहत आहे, अशी सर्वसामान्य नागरिकांतून चर्चेचा होत आहे.

माळशिरस-पिलीव रोड तालुक्यातील सत्ताधाऱ्यांनी गेली कित्येक वर्ष हा रस्ता जाणीवपूर्वक होऊ दिला नाही. सध्या यावरती मोठमोठे खड्डे व धुळीचे साम्राज्य झाले आहे. कामाचे टेंडर होऊन कित्येक दिवस झाले अजून चालू झालेले नाही. येत्या चार दिवसात काम चालू झाले नाही तर, सर्व ग्रामस्थ सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज समोर तीव्र आंदोलन करणार आहे. – सतिश मोटे सरपंच, मोटेवाडी

मी माळशिरस येथे दररोज शाळेत ये-जा करत असतो. परंतु, रस्त्याने जात येत असताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. रस्त्यावर खूप मोठे खड्डे पडलेले आहेत आणि धुळीने कपडे व डोळे खराब होत असतात. कारखाना चालू असल्यामुळे उसाने भरलेली मोठी वाहने रस्त्याने जात असल्यामुळे प्रवास जीव मुठीत धरून करावा लागत आहे. – लोकेश तरंगे विद्यार्थी, तरंगफळ

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

One Comment

  1. I thoroughly enjoyed this article. The analysis was spot-on and left me wanting to learn more. Let’s discuss further. Click on my nickname for more engaging discussions.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort