ताज्या बातम्यासामाजिक

माळशिरस तालुक्यातील थेट जनतेतील सरपंच पदाच्या निवडणुका निर्भयपणे व शांततेत पार पडल्या.

सर्वात जास्त टक्केवारी कोंढारपट्टा गावात 96.84% मतदान,सर्वच गावांच्या निकालाची उत्कंठा लागली धक्कादायक निकाल येण्याची शक्यता.

तहसीलदार सुरेश शेजुळ, नायब तहसीलदार अमोल कदम यांचे उत्कृष्ट नियोजनात दहा ग्रामपंचायतीचा टप्पा पूर्ण झाला.

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील दहा गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केलेला होता. त्यामध्ये माळीनगर, धर्मपुरी, कारूंडे, वाफेगाव, कोंढारपट्टा, दहिगाव, देशमुखवाडी, लवंग, कण्हेर, सवतगव्हाण या ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणुक झालेली आहे. तहसीलदार सुरेश शेजुळ, नायब तहसीलदार अमोल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत निवडणुका निर्भय वातावरणात व शांततेत पार पडलेल्या आहेत.

धर्मपुरी गावामध्ये महिला 1868 पुरुष 2052 असे 3920 मतदार होते, त्यापैकी महिला 1433 पुरुष 1625 असे 3058 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला 78.01 टक्के मतदान झालेले आहे. कारूंडे गावामध्ये महिला 1518 पुरुष 1592 असे 3110 मतदार होते त्यापैकी महिला 1234 पुरुष 1395 असे 2629 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला 84.53 टक्के मतदान झालेले आहे. दहिगाव गावामध्ये महिला 3545 पुरुष 3818 असे 7363 मतदार होते त्यापैकी महिला 2667 पुरुष 2898 असे 5465 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला 74.22 टक्के मतदान झालेले आहे. कण्हेर गावामध्ये महिला 1993 पुरुष 2082 असे 4075 मतदार होते त्यापैकी महिला 1813 पुरुष 1892 असे 3705 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला 90.92% मतदान झालेले आहे. सवतगव्हाण गावामध्ये महिला 882 पुरुष 947 असे 1829 मतदार होते त्यापैकी महिला 674 पुरुष 739 असे 1413 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला 77.26% मतदान झालेले आहे. माळीनगर गावात मध्ये महिला 3735 पुरुष 3782 असे 7517 मतदार होते त्यापैकी महिला 2526 पुरुष 2705 असे 5231 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला 69. 59% मतदान झालेले आहे. कोंढारपट्टा गावामध्ये महिला 348 पुरुष 444 असे 792 मतदार होते त्यापैकी महिला 342 पुरुष 425 असे 767 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला 96.84% मतदान झालेले आहे. वाफेगाव गावामध्ये महिला 628 पुरुष 691 असे 1319 मतदार होते त्यापैकी महिला 576 पुरुष 634 असे 1210 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला 91.74 टक्के मतदान झालेले आहे. लवंग गावामध्ये महिला 2311 पुरुष 2512 असे 4823 मतदार होते त्यापैकी महिला 1892 पुरुष 2096 असे 3988 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला 82.69% मतदान झालेले आहे.

नऊ गावातील चाळीस प्रभाग 60 मतदान केंद्रे होती. महिला 16828 पुरुष 17920 असे 34748 एकूण मतदार होते त्यापैकी महिला 13057 पुरुष 14409 असे 27466 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला 79.04% मतदान झालेले आहे. देशमुखवाडी ग्रामपंचायत थेट जनतेतील सरपंच व ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध झालेले आहेत. सवतगव्हाण ग्रामपंचायतचे थेट जनतेतील सरपंच व दोन सदस्य बिनविरोध झालेले आहेत तर दहिगाव ग्रामपंचायतचे दोन ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध झालेले आहेत.

थेट जनतेतील सरपंच पदामुळे निवडणुकीत रस्सीखेच, रंगत व चुरस वाढली आहे. धर्मपुरी गावात चार दहिगाव व लवंग गावात तीन तर इतर ठिकाणी समोरासमोर लढत झालेली आहे.

दहा गावांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी नेमलेले आहेत कण्हेर व सवतगव्हाण श्री. एस. के. खंडागळे, वाफेगाव व कोंढारपट्टा श्री. व्ही. टी. लोखंडे, कारूंडे व धर्मपुरी श्री. एस. ए. भोसले, देशमुखवाडी एस.पी. रणदिवे, पिलीव सुळेवाडी व डोंबाळवाडी (खुडूस) श्री. आर. टी. ननवरे, माळीनगर व लवंग श्री. सी. एस. भोसले, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. त्यांना ग्रामविकास अधिकारी यांनी सहकार्य केलेले होते.
तहसीलदार सुरेश शेजुळ, नायब तहसीलदार अमोल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीच्या निवडणुका पारदर्शक व निर्भयपणे शांततेत पार पडलेल्या आहेत. अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे यांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता. सोमवार दि. 06/11/2023 रोजी सकाळी नऊ वाजता मतमोजणी होणार आहे. याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले आहे. बारामती झटका यूट्यूब चॅनलवर निकालाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. तरी वाचक व प्रेक्षक मतदार ग्रामस्थ सर्वांनी याची नोंद घ्यावी.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort