श्री चंद्रशेखर विद्यालय, श्रीपूर प्राथमिक शाळेची राष्ट्रीय स्तरावर निवड…

राष्ट्रीय सुवर्ण बाण पुरस्कार नवी दिल्ली २०२४ देऊन २२ फेब्रुवारी रोजी होणार गुणगौरव
श्रीपूर (बारामती झटका)
भारत स्काऊट्स आणि गाईड्स राष्ट्रीय मुख्यालय, नवी दिल्ली द्वारा आयोजित नॅशनल गोल्डन ॲरो अवार्ड २०२४ या पुरस्कारासाठी आबासाहेब देशमुख चॅरिटेबल ट्रस्ट शैक्षणिक संकुलातील श्री चंद्रशेखर विद्यालय, श्रीपूर ता. माळशिरस, प्राथमिक शाळेतील – रूद्र सचिन सावंत, शंभूराजे सोमनाथ मोरे, अरमान अजिम पठाण, रेहान मोहसिनखान पठाण, अविष्कार विलास कवठेकर या स्काऊट-कब विद्यार्थ्यांची आणि अनुष्का अनिल रणदिवे, समृद्धी संदिप पवार, विरा नंदकुमार चव्हाण, स्वराली संदिप तेरदाळे या बुलबुल-विद्यार्थीनींची स्काऊट आणि गाईड मधील वयोगट दहा वर्षांच्या आतील राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च पुरस्कारासाठी निवड झाली. या विद्यार्थ्यांना सोलापूर जिल्हयाचे ट्रेनिंग कमिशनर स्काऊटर शंकरराव यादव, शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा जाधव व फ्लॉक लीडर करूणा धाईंजे यांनी मार्गदर्शन केले.
येत्या २२ फेब्रुवारी २०२४ रोजी स्काऊट-गाईड चिंतन दिनी केद्रींय युवा कल्याण व स्पोर्ट मिनिस्टर भारत सरकार आणि नॅशनल प्रेसिडेंट डॉ. अनिल कुमार जैन यांच्या शुभहस्ते व नॅशनल चीफ कमिशनर के. के. खंडेलवाल, नॅशनल डायरेक्टर राजकुमार कौशिकजी यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होत आहे. नॅशनल युथ कॉम्प्लेक्स गदपूरी, जि. पलवल, हरियाणा राज्यात कु. करूणा धाईंजे व नऊ विद्यार्थ्यांना घेऊन महाराष्ट्र राज्य कंटीजेंट लीडर ट्रेनर- शंकरराव यादव हे जात आहेत.

राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करण्याची संधी श्री चंद्रशेखर विद्यालय प्राथमिक शाळेला पाचव्यांदा मिळाली आहे. यापूर्वी चार वेळा शाळेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर शाळेचा नावलौकिक मिळवला आहे, याबद्दल या बालचमूचे सर्वत्र कौतुक होत आहे. या यशाच्या शिखरावर चढताना या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर यश मिळविले त्याचप्रमाणे राज्य स्तरावरील चतुर्थ चरण व हिरक पंख हे राज्य पुरस्कार मिळविले आहेत.
या यशाबद्दल सोलापूर जिल्हा स्काऊट आणि गाईडच्या जिल्हा मुख्य आयुक्त तथा शिक्षणाधिकारी प्राथमिकच्या तृप्ती अंधारे, जिल्हा आयुक्त स्काऊट तथा माध्यमिक शिक्षणाधिकारी मारूती फडके, जिल्हा चिटणीस दत्तात्रय गाजरे, जिल्हा स्काऊट संघटक श्रीधर मोरे, जिल्हा संघटक गाईड अनुसया सिरसाठ, संस्थापक अध्यक्ष डॉ. रामदासजी देशमुख, उपाध्यक्षा शुभांगीताई देशमुख, सचिव भारत कारंडे, संचालक यशराज भैय्या देशमुख, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष राजकुमार शिंदे, शिक्षक-पालक संघ उपाध्यक्ष इम्रान शेख यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.