खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची रणजीतशेठ मोटे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट व स्नेहभोजन..
माळशिरस (बारामती झटका)
माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगरसेवक रणजीतशेठ मोटे यांच्या माळशिरस येथील निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी अनेक जुन्या राजकीय गोष्टींना उजाळा मिळाला.
माळशिरस तालुक्यात प्रस्थापितांच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थाने माळशिरस शहर केंद्रबिंदू ठरलेले होते. माळशिरस शहरात जनसेवा हॉटेल सर्व माळशिरस तालुक्यातील प्रस्थापितांच्या विरोधातील लोकांचे हक्काचे ठिकाण होते. जनता दलाचे माजी जिल्हाध्यक्ष माळशिरसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव उर्फ मामा मोटे यांनी तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने विरोधी गट जिवंत ठेवण्याचे काम केलेले होते.
राजकारणात योगदान असणाऱ्या मोटे परिवारांच्या निवासस्थानी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगरसेवक रणजीतशेठ मोटे यांनी स्नेहभोजनाचे निमंत्रण दिलेले होते. त्यानिमित्त खासदार यांनी मोटे परिवारांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली होती. रणजीतशेठ मोटे परिवारांच्या वतीने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे सातारा जिल्हा प्रमुख हनुमंतराव चौरे, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर व माजी जिल्हा परिषद सदस्य संजयअण्णा मोटे, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव सोपानकाका नारनवर, सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य के. के. पाटील, तरंगफळ गावचे माजी सरपंच भाजपचे नेते सुरेशराव तरंगे, माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगरसेवक संतोष आबा वाघमोडे, सुरेश आबा वाघमोडे, भगवान नाना थोरात, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, भारतीय जनता पार्टीचे माळशिरस तालुका संघटन सरचिटणीस संजय देशमुख, भाजपा युवा मोर्चाचे माजी तालुका अध्यक्ष प्राध्यापक दादासाहेब खरात, भांबुर्डी ग्रामपंचायतचे सदस्य रवीतात्या मोटे, ॲड. शरदराव मदने, संजय पवार युवा उद्योजक सुरज कदम, आप्पा जानकर, मोहोळकर सर, वाहिद इनामदार, हरी साळवे, राजेंद्र मिसाळ, कांताबापू गोरड, युवा उद्योजक प्रदीप रणजीत मोटे, माजी उपसरपंच माऊली नामदास, रेहान इनामदार आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्नेहभोजनानंतर अनेक विषयांवर औपचारिक चर्चा झाली. खऱ्या अर्थाने माढा लोकसभा मतदारसंघात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे अनेक प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडून माळशिरस तालुक्याच्या जडणघडणीत मोलाचे सहकार्य होणार आहे, यासाठी उपस्थितांनी खासदार यांच्या कार्याचे कौतुक केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Escort Sakarya Bayan Birbirinden güzel kadınlarla alakadar ne ararsanız bulabileceğiniz Bayan arkadaş arama sayfası sizin için 24 saat hizmet sunar.