ताज्या बातम्या

चि. सौ. कां. अश्विनी कचरे, कचरेवाडी आणि चि. योगेश तरंगे, तरंगफळ यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार…

प्रेषक – श्री गणेश संदिपान कचरे, अवर सचिव महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई

माळशिरस (बारामती झटका)

श्री. संदिपान अण्णा कचरे यांची नात व श्री. बाजीराव संदिपान कचरे रा. कचरेवाडी, 61 फाटा, ता. माळशिरस यांची सुकन्या चि. सौ. कां. अश्विनी कचरे आणि स्वर्गीय नारायण माधव तरंगे यांचे नातू व श्री. विश्वनाथ नारायण तरंगे रा. तरंगफळ, ता. माळशिरस यांचे ज्येष्ठ सुपुत्र चिरंजीव योगेश तरंगे यांचा शाही शुभविवाह सोहळा रविवार दि. 09/06/2024 रोजी दुपारी 12 वाजून 30 मिनिटे या शुभ मुहूर्तावर अक्षता मंगल कार्यालय, माळशिरस-अकलूज रोड येथे संपन्न होत आहे.

तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित रहावे, असे प्रेषक श्री. गणेश संदिपान कचरे अव्वर सचिव, महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई आणि समस्त कचरे परिवार कचरेवाडी यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.

स्वर्गीय रामहरी अण्णा कचरे, स्वर्गीय प्रकाश उर्फ सर्जेराव रामहरी कचरे, स्वर्गीय सौ. पार्वती संदिपान कचरे यांच्या आशीर्वादाने आमच्या परिवारातील शुभमंगल प्रसंगी सहकुटुंब मित्रपरिवार व नातेवाईक यांनी अगत्य येऊन वधूवरांना शुभ आशीर्वाद द्यावे, ही विनंती. आपले स्नेहांकित सौ‌. कलावती व श्री सुखदेव अण्णा कचरे, सौ. मंगल व श्री. जयराम बाबा कचरे, सौ. शांताबाई व श्री. बापू देनु कचरे आणि समस्त कचरे परिवार कचरेवाडी यांचे कडून आग्रहाचे निमंत्रण आहे.

लग्नाच्या घाईगडबडीत आपणापर्यंत हस्ते परहस्ते आमंत्रण अथवा निमंत्रण न मिळाल्यास हेच आग्रहाचे निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे, असे प्रेक्षक श्री. गणेश संदिपान कचरे अवर सचिव महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button