ना. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या बंगल्यावर महायुतीच्या मित्र पक्षांची बैठक संपन्न
विधानसभा निवडणुकीत महायुती 200 जागेवर घवघवीत यश प्राप्त करुन एक हाती सत्ता आणू – ॲड. श्रीहरी बागल
मुंबई (बारामती झटका)
शुक्रवार दि. ०७/०६/२०२४ रोजी मुंबई मंत्रालयासमोरील ना. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या बी – 5 बंगल्यावर महायुतीच्या मित्र पक्षांची बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पदाचा राजीनामा देऊ नये व विधानसभा निवडणुकीची तयारी करावी. सर्व लहान-मोठे मित्र पक्ष त्यांच्याबरोबर आहेत, असा ठराव मंजूर करण्यात आला. या बैठकीत निवडणुकीच्या तयारीला लागायचे ठरले आहे.
महाराष्ट्रात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती 200 जागेवर घवघवीत यश प्राप्त करुन एक हाती सत्ता आणू, असा विश्वास या वेळेस राष्ट्रीय स्वराज्य सेना राजकीय पक्षांचे अध्यक्ष ॲड. श्रीहरी बागल यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय स्वराज्य सेना हा मराठा राजकीय पक्ष असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात स्वराज्य दौरा चालू करून तालुका निहाय मेळावे घेणार आहे. मराठा समाजाचे झालेले अनेक गैरसमज दुर करुन भारतीय जनता पार्टीने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देऊन माझ्या समाजाचे होणार नुकसान थांबवले आहे हे व असे अनेक विषय घेऊन लोकांसमोर जाणार आहे. सकल मराठा समाज परत एकदा महायुतीच्या पाठी भक्कम उभा राहुन देशाच्या विकासाला हातभार लावेल, असे मत व्यक्त केले आहे.
स्वराज्य दौरा चालु असताना घटना दुरुस्तीबद्दल झालेला अपप्रचार दुर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच मराठा आरक्षणावर फसवी, खोटी माहिती पसरवली आहे, तीही दुर करून सत्य व खरी परिस्थिती लोकांसमोर आणणार आहे. तसेच लवकरच महायुतीचे मित्र पक्ष वाय. बी. चव्हाण येथे एकत्रित मेळावाही घेणार आहे, असे ठरले आहे.
या वेळेस माजीमंत्री सदाभाऊ खोत, कवाडे गटाचे जयदीप कवाडे, राष्ट्रीय समाज पक्षाचे विठ्ठल यमकर, अनिल कांबळे साहेब व इतर प्रमुख लोक उपस्थित होते.
ॲड. श्रीहरी बागल
राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय स्वराज्य सेना (राजकिय पक्ष) भाजपा महायुतीचा घटक पक्ष. मो. 9820305909
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
xnxx