मराठा सेवा संघाचा वर्धापन दिन अकलूज येथे संपन्न होणार

अकलूज (बारामती झटका)
मराठा सेवा संघ शाखा माळशिरस तालुक्याच्या वतीने मराठा सेवा संघाचा ३४ वा वर्धापन दिन रविवार दि. १ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता अकलूज येथील शासकीय विश्रामगृह येथे संपन्न होत आहे. या वर्धापन दिनानिमित्त मराठा सेवा संघाच्या हितचिंतकांसह सर्व बहुजन समाज बांधव, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व आजी-माजी पदाधिकारी, सभासद यांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे.
तरी सर्वांनी मोठ्या संख्येने सकाळी १० वा. अकलूज येथील शासकीय विश्रामगृह येथे उपस्थित राहावे, असे मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड तालुका शाखा माळशिरस यांच्यावतीने आवाहन करण्यात आलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.