ताज्या बातम्या

माजी उपसभापती युवा नेते किशोरभैय्या सुळ पाटील यांनी सपताळे परिवार यांची सांत्वनपर भेट घेतली..

तिरवंडी (बारामती झटका)

सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब सपताळे यांच्या मातोश्री श्रीमती निलाबाई दादा सपकाळे यांचे वयाच्या 96 व्या वर्षी वार्धक्याने दुःखद निधन झालेले आहे. माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती युवा नेते किशोरभैय्या सुळ पाटील यांनी सपताळे परिवार यांच्या तिरवंडी येथील निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली.

यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे माळशिरस तालुका अध्यक्ष जलनायक शिवराजभैय्या पुकळे, ओमराजे झगडे, खंडूशेठ माने, स्वप्निलकुमार राऊत, श्रीनिवास कदम पाटील आदी उपस्थित होते.

स्वर्गीय निलाबाई सपताळे यांना पाच मुले, एक मुलगी, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपला संसार करून मुलांवर चांगले संस्कार केलेले होते. राजकीय घराण्याचा वारसा नसतानासुद्धा सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये बाळासाहेब सपताळे यांना गोरगरीब व सर्वसामान्य जनतेची कामे करताना पाहिलेले आहे. आपल्या मुलांचा, नातवांचा स्वर्गीय निलाबाई यांना अभिमान व गौरव होता. त्यांच्या दुःखद निधनाने सपताळे परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे.

सपताळे परिवारांचे सांत्वन करण्यासाठी युवा नेते किशोर भैय्या सुळ पाटील यांनी आवर्जून सपताळे परिवारांना भेट दिली.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button