फाॅरेक्स ट्रेंडिंग कंपनीकडून 03 कोटी 25 लाख 8 हजाराची आर्थिक फसवणूक

जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक दिगंबर पोपट गायकवाड यांनी पोलीस उप आयुक्त आर्थिक गुन्हे शाखा पुणे यांच्याकडे 7 व्यक्तींविरोधात एफ आय आर दाखल..
माळशिरस (बारामती झटका)
श्री. दिगंबर पोपट गायकवाड वय वर्ष 38 रा. गिरवी, ता. फलटण, जि. सातारा, येथील मूळ रहिवासी असणारे सध्या माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा साळुंखे वस्ती मोरोची व सध्या जिल्हा परिषद शाळा खडकमळा येथे कार्यरत असणारे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक यांनी पोलीस उप आयुक्त आर्थिक गुन्हे शाखा पुणे शहर यांचेकडे हनुमंत तुकाराम मोरे गांधीनगर, काशीळ जि. सातारा, नामदेव अंकुश गायकवाड कोळकी ता. फलटण, राजश्री रामचंद्र सस्ते कोळकी ता. फलटण, अनिल चव्हाण यमुनानगर सातारा, रूपाली अनिल चव्हाण यमुनानगर सातारा, शशिकला मारुती वादगावे सातारा, श्री. सुरेश गोरख कुंभार सातारा यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता 1860 कलम406, 409, 420, 34 महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थामधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999 कलम तीन व चार प्रमाणे गुन्हा नोंद झालेला असून सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा पुणे शहर पोलीस निरीक्षक जी. जी. मोरे करीत आहेत.

सदरच्या गुन्ह्यातील हकीगत अशी, फॉरेक्स ट्रेंडिंगमध्ये पैसे गुंतवल्यानंतर महिन्याला वीस ते पंचवीस टक्के रक्कम फायदा मिळतो. सदरची रक्कम क्रिएशन ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स एलपी या कंपनीचे मोठे मालक म्हणून रूपाली चव्हाण, अनिल चव्हाण, हनुमंत मोरे रा. सातारा, असे असल्याचे सांगून तुम्हाला दहा लाख रुपयावर दर महिना 20 टक्के परतावा ऑनलाइन किंवा कॅश देऊ असे सांगून दिगंबर पोपट गायकवाड यांचे नातेवाईक व मित्रपरिवार अश्विनी दिगंबर गायकवाड, ज्ञानेश तुकाराम पवार, संजय किसन थोरात, अनुसया संजय थोरात, औदुंबर पोपट गायकवाड, तुषार शितल बनकर, अमित रामनाथ पवार, प्रवीण रमेश मुळे, अशोक तुकाराम हुंबे, अमोल पोपट हुंबे, अर्चना चांगदेव पवार, राहुल गोडसे, हनीफ रहमान शेख, रत्नमाला जगन्नाथ कदम, संध्या पंढरीनाथ पवार, ज्ञानेश्वर रामभाऊ चव्हाण यांनी सुद्धा क्रिएशन ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स एलपी या नावाने असलेल्या अकाउंटवर 02 कोटी 85 लाख 8 हजार रुपये व रोख रक्कम 40 लाख दिलेली आहे. अशी एकूण रक्कम तीन कोटी 25 लाख 8 हजार रुपयाची आर्थिक फसवणूक झालेली असल्याची तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.