ताज्या बातम्या

माळशिरस पंचायत समितीच्या नूतन गटविकास अधिकारी पदी डॉ. आबासाहेब हरी पवार यांची नियुक्ती..

माळशिरस (बारामती झटका)

करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व माळशिरस पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी श्री. मनोज बापूराव राऊत यांची प्रकल्प संचालक जलजीवन मिशन जिल्हा परिषद धाराशिव येथे बदली झाल्या नंतर माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब हरी पवार यांची नव्याने नियुक्ती झालेली आहे.

डॉ. आबासाहेब हरी पवार गटविकास अधिकारी पंचायत समिती वाळवा, जि. सांगली, येथे कार्यरत होते. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या अवर सचिव डॉ. शर्मिला जोशी यांनी माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पदावर बदलीने नेमणूक करण्यात आलेली आहे.

डॉ. आबासाहेब हरी पवार यांचे पशु वैद्यकीय शास्त्रात एम.व्ही.एस.सी. (M.V.Sc.) शिक्षण झालेले आहे. २००१ च्या बॅचमधील एमपीएससी मधून निवड झालेली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, शाहूवाडी, कागल, सातारा जिल्ह्यातील कराड आणि सांगली जिल्ह्यातील वाळवा येथे गटविकास अधिकारी या पदावर कामकाज केलेले आहे. अनुभवी असणारे डॉ. आबासाहेब पवार यांचे माळशिरस पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या भावी कारकिर्दीस बारामती झटका वेब पोर्टल आणि युट्युब चॅनल च्या वतीने हार्दिक शुभेच्छा आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button