चि. सौ. कां. सारिका घाडगे, मळोली व चि. आकाश शिंदे, पळशी यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार…

प्रेषक
श्री. संतोष मच्छिंद्र घाडगे
अध्यक्ष, रयत क्रांती शेतकरी संघटना मळोली.
मळोली (बारामती झटका)
श्री. मच्छिंद्र आबा घाडगे यांची नात व श्री. संतोष मच्छिंद्र घाडगे मळोली, ता. माळशिरस, यांची ज्येष्ठ कन्या चि. सौ. कां. सारिका आणि श्री. केरू रामा शिंदे यांचे नातू व श्री. सतीश केरू शिंदे रा. पळशी, ता. माण, यांचे ज्येष्ठ सुपुत्र चि. आकाश यांचा शाही शुभविवाह सोहळा बुधवार दि. 11/12/2024 रोजी दुपारी 12 वाजून 10 मिनिटे या शुभमुहूर्तावर सिताराम मल्टीपर्पज हॉल, दिवडपाटी, ता. माण, जि. सातारा, येथे संपन्न होणार आहे. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित राहावे असे प्रेषक श्री. संतोष मच्छिंद्र घाडगे अध्यक्ष, रयत क्रांती शेतकरी संघटना, मळोली यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.
पाऊस क्षणाचा पण गारवा कायमचा, भेट क्षणाची पण मैत्री दोन जीवाची, मुहूर्त क्षणाचा पण नाती आयुष्याची, आपला सहवास क्षणाचा पण आशीर्वाद कायमचा…. यासाठी आपण सहकुटुंब सहपरिवार अगत्य येऊन वधूवरांना शुभ आशीर्वाद द्यावेत, असे आपले नम्र श्री. मच्छिंद्र आबा घाडगे, सौ. शैला व श्री. संतोष मच्छिंद्र घाडगे, सौ. राणी व श्री. धनाजी मच्छिंद्र घाडगे, सौ. मनीषा व श्री. गोरखनाथ मच्छिंद्र घाडगे आणि समस्त घाडगे परिवार, मळोली यांच्या वतीने उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे.

लग्नाच्या घाईगडबडीत आपणांस आमंत्रण अथवा निमंत्रण हस्ते परहस्ते देण्याचे राहून गेले असल्यास हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे, असे रयत क्रांती शेतकरी संघटना मळोली अध्यक्ष, श्री. संतोष मच्छिंद्र घाडगे यांनी नम्र आवाहन केलेले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.