श्री संत ज्ञानेश्वर महाराज अखंड हरिनाम सप्ताहाचे ४९ वे वर्ष संपन्न होत आहे…

जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री संत तुकाराम महाराजांचे आठवे वंशज व फडपरंपरेचे ज्येष्ठ अधिकारी वै. श्रीगुरु भागवत महाराज देहूकर यांचे ४९ व्या पुण्यस्मरणार्थ अखंड हरिनाम सप्ताह आयोजन…
मळोली (बारामती झटका)
ज्या विचाराच्या माध्यमातून अद्ययावत सर्व मनुष्यमात्रांना जीवनामध्ये सुख, समाधान, शांती, आनंद, स्थैर्य प्राप्त होईल, असे वैचारिक धन हे फक्त संत समागमातच प्राप्त होऊ शकते आणि त्यातीलच एक भाग म्हणून मळोली, ता. माळशिरस, येथे सालाबादप्रमाणे संत तुकाराम महाराजांचे आठवे वंशज व फड परंपरेचे जेष्ठ अधिकारी वैकुंठवासी श्रीगुरु भागवत महाराज देहूकर यांच्या ४९ व्या पूर्ण स्मरणार्थ बुधवार दि. 30/04/2025 ते बुधवार दि. 07/05/2025 अखेर अखंड हरिनाम सप्ताहाचे ४९ वे वर्ष श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर मळोली ता. माळशिरस येथे संपन्न होत आहे.
अखंड हरिनाम सप्ताह वै. ह. भ. प. श्रीगुरु मधुसूदन महाराज देहूकर व वै. ह. भ. प. ज्ञानेश्वर माऊली महाराज मुळोळीकर यांच्या कृपा आशीर्वादाने व श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र देहुचे माजी अध्यक्ष ह. भ. प. श्रीगुरु बापूसाहेब महाराज देहूकर त्यांच्या सप्ताह नेतृत्वात व्यासपीठ चालक ह. भ. प. मधुकर सोपान जाधव (काका), ह. भ. प. हरिश्चंद्र तुकाराम जाधव व्यासपीठ चालकांचे पहाटे 04 ते 06 काकडा आरती, सकाळी 06 ते 07 विष्णू सहस्त्रनाम, सकाळी 09 ते 12 गाथा भजन, दुपारी 12 ते 04 भोजन व विश्रांती, सायंकाळी 05 ते 06 हरिपाठ, 06 ते 08 स्नेह भोजन, आठ ते दहा कीर्तन व रात्री 11 ते 4 हरी जागर असा कार्यक्रम होणार आहे.
बुधवार दि. 30/4/20/25 रोजी सायंकाळी 08 ते 10 संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह. भ. प. ऋषिकेश महाराज देहूकर यांचे सुश्राव्य कीर्तन, हरीजागर मळोली, तांदुळवाडी, तोंडले, बोंडले, गुरुवार दि. 01/05/2025 ह. भ. प. दत्तात्रय महाराज पवार पंढरपूर हरिजागर श्रीपुर, माळीनगर, तांबवे, आनंदनगर, पाटीलवस्ती, शुक्रवार दि. 02/05/2025 ह.भ.प. भागवत महाराज संत (देवकर फड) हरिजागर महाळुंग, टणु, टाकळी, सुरवड, वकीलवस्ती, शनिवार दि. 03/05/2025 अध्यक्ष श्री सोपानकाका महाराज पालखी सोहळा दिंडी समाज पंढरपूर ह. भ. प. राम महाराज कदम हरिजागर संगम, गिरवी, पिंपरी, नरसिंहपुर, शेंडेचिंच रविवार दि. 04/05/2025 संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे वंशज पंढरपूर ह. भ. प. माधव महाराज नामदास हरिजागर खंडाळी, कोळेगाव, वेळापूर, गारअकोले, सोमवार दि. 05/05/2025 विश्वस्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज देशमुख जळगावकर हरिजागर वडापुरी, पंधारवाडी, बावडा, निमगाव, मंगळवार 06/05/2025 ह. भ. प. मधुसूदन महाराज ठाकूर बुवा दैठणकर परभणी हरिजागर कोंडी, ढेकळेवाडी, भाळवणी, धोंडेवाडी. बुधवार दि. 07/05/2025 रोजी सकाळी 9 ते 11 ह. भ. प. सोहम महाराज देहूकर मळोली यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.
किर्तनसाथ ह. भ. प. श्रीमंत सोपान जाधव (बापू) विणेकरी देहूकर फड, ह. भ. प. पांडुरंग सोपान जाधव, ह. भ. प. नामदेव तुकाराम जाधव, ह. भ. प. हनुमंत परमानंद जाधव, मृदंगाचार्य ह. भ. प. बापूसाहेब शिंदे मळोली, ह. भ. प. सौरभ पारसे, तांदुळवाडी, चोपदार ह. भ. प. सुभाष बाजीराव जाधव मळोली, ह. भ. प. दत्तात्रय महाराज अकलूज, सकाळी अल्पोपहार अन्नदाते श्री. संजय केशव पवार, श्री. जयवंत सदाशिव पाटील, श्री. राजन रामचंद्र जाधव, श्री. सुहास श्रीरंग जाधव, श्री. सुनील भिवाजी गुजर, श्री. संतोष गजेंद्र काळे, श्री. वसंत महादेव जाधव सर, श्री. राजेंद्र नानासाहेब पवार,
दुपारच्या भोजनाचे अन्नदाते श्री. नितीन साहेबराव जाधव, श्री. आनंदराव नामदेव जाधव, श्री. हनुमंत भागवत पवार, श्री. विजयसिंह कृष्णात पाटील, श्री. शिरीष शिवाजी जाधव, मोरया अर्थमूव्हर्स, श्री. रमेश नामदेव माने, श्री. किरण महादेव गुजर, के. के. कंस्ट्रक्शन, संध्याकाळी भोजनाचे अन्नदाते श्री. वासुदेव रामचंद्र जोशी गुरुजी, श्री. अशोक चांगदेव जाधव सर, ह. भ. प. शंकर सोपानराव माने, श्री. उद्धव मारुती शिंदे, श्री. हरिदास मारुती जाधव पाटील, श्री. निवृत्ती रामहरी जाधव, ह. भ. प. नवनाथ मोहनराव जाधव, काला महाप्रसाद ह. भ. प. कै. तुकाराम नाना जाधव विणेकरी देहूकर फड व श्रीमती खासाबाई तुकाराम जाधव यांचे स्मरणार्थ ह. भ. प. गणेश वासुदेव जाधव, ह. भ. प. प्रशांत हरिचंद्र जाधव, ह. भ. प. महेश नामदेव जाधव यांच्या वतीने होणार आहे. मोफत पाणीपुरवठा व्यवस्थापन ह. भ. प. पांडुरंग निवृत्ती जाधव, माजी पोलीस पाटील अष्टविनायक अक्वा मळोली, मथुरा अक्वा मळोली, मंडप व लाईट व्यवस्थापन श्री. पप्पू लिगाडे धानोरे.
श्री संत ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यातील वाचकांना स्व. सौ. वेणुबाई शिवाजीराव कदम पाटील प्रतिष्ठान मळोली, ता. माळशिरस यांच्या स्मरणार्थ श्री. सुरेशराव शिवाजीराव कदम पाटील, श्री. हरिदास शिवाजीराव कदम पाटील, श्री. श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील यांच्या वतीने वाचकांना श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची ज्ञानेश्वरी ग्रंथ ज्ञानेश्वरी सप्रेम भेट देणार आहे.
सदर कार्यक्रमास देहूकर फडावरील सर्व वारकरी भजनी मंडळ उपस्थित राहणार आहेत. नाम सप्ताह यांना आर्थिक स्वरूपात दान करावयाचे आहे त्यांचा सन्मानपूर्वक स्वीकार केला जाईल. त्यासाठी संपर्क श्री. उद्धवराव पाटील गुरुजी 9850635792, डॉ. दिनेशसिंह शिंदे 8830804211 या नंबर वर संपर्क साधावा.
श्री संत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा भव्य आणि दिव्य स्वरूपात संपन्न होत आहे. तरी या सुवर्णसंधीचा पंचक्रोशीतील सर्व अबालवृद्ध भाविकांनी लाभ घ्यावा. पंचक्रोशीतील शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी व महिला पुरुष यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ मळोली यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.