ताज्या बातम्यासामाजिक

चि. दयासागर कचरे, कचरेवाडी आणि चि. सौ. कां. सायली शेंडगे, कचरेवाडी यांचा शाही शुभ विवाह सोहळा संपन्न झाला…

विधान परिषदेचे मा. आ. रामहरी रुपनवर.
विधानसभेचे मा. आ. राम सातपुते.
मा. जिल्हा परिषद अध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील. यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत विवाह सोहळा संपन्न…

कचरेवाडी (बारामती झटका)

स्व. भगवान माणिकराव कचरे यांचे नातू व श्री. मच्छिंद्र भगवान कचरे, रा. कचरेवाडी, ता. माळशिरस, यांचे चि. दयासागर आणि स्व. माणिक गणपत शेंडगे यांची नात व स्व. शंकर माणिक शेंडगे, रा. कचरेवाडी, ता. माळशिरस, यांची जेष्ठ कन्या चि. सौ. कां. सायली यांचा शाही शुभविवाह सोहळा शनिवार दि. 24/05/2025 रोजी दुपारी 01 वाजून 15 मिनिटे या शुभमुहूर्तावर आनंदी गणेश सांस्कृतिक भवन, आनंदनगर, अकलूज, ता. माळशिरस येथे संपन्न झाला.

सदरच्या विवाह सोहळ्यास विधान परिषदेचे माजी आमदार ॲड. रामहरी रुपनवर, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील, भाजपचे विशेष निमंत्रित प्रांतिक सदस्य तथा माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख, माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य व माळशिरसचे माजी सरपंच तुकारामभाऊ देशमुख, माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक सचिन आप्पा वावरे, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक व माळशिरस नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष डॉ. मारुतीराव पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य गौतमआबा माने पाटील, बोरी गावचे माजी सरपंच गुणवंतराव पाटील, माजी सरपंच हनुमंतराव पाटील, स्वाभिमानी शिक्षक पतसंस्था भवानीनगरचे संस्थापक अध्यक्ष भगवान घुले सर, सेवानिवृत्त उप अभियंता काशिनाथ देवकाते रावसाहेब, युवा नेते राहुल बापू वाघमोडे, युवा उद्योजक गोरख देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

मित्रपरिवार व नातेवाईक यांनी शाही शुभ विवाह सोहळ्यास उपस्थित राहावे, असे प्रेषक विधान परिषदेचे माजी आमदार श्री. रामहरी गोविंद रुपनवर, बोरी गावचे माजी सरपंच श्री. गुणवंत माधवराव पाटील, श्री. संदिपान साहेबराव मारकड (सर), श्री. मारुती गलांडे (दादा) दहिवडी, श्री विठ्ठल दुध डेअरीचे चेअरमन श्री. सोमनाथ भगवान कचरे आणि समस्त कचरे परिवार यांच्या वतीने आवाहन करण्यात आलेले होते.

सात जन्माची साथ मिळो, संसाराचा गंध दरवळो, प्रेमाने नांदो हसतखेळत, सुखद जीवन फुलत राहो, पवित्र बंधन साक्षीला आहे, श्री गणेशाची कृपा आहे. दयासागर आणि सायली बंधन प्रेमाचे अटळ आहे, आशीर्वादाने न्हालो, आम्ही स्नेहाची चाहूल लागो, मंगलमय सोहळ्याला या सौख्य आमच्या नांदो, असे आपले स्नेहांकित सौ. सुनंदा व श्री. दत्तात्रय भगवान कचरे, सौ. सुशीला व श्री. जालिंदर भगवान कचरे, सौ. संगीता व श्री. मच्छिंद्र भगवान कचरे, सौ. सुनीता व श्री. सोमनाथ भगवान कचरे आणि समस्त कचरे परिवार, कचरेवाडी यांच्यावतीने शाही शुभ विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात आले होते. कचरे व शेंडगे यांच्या विनंतीला मान देऊन मित्र परिवार व नातेवाईक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शाही शुभविवाह सोहळ्यावेळी शब्दसूमनांनी स्वागत निवेदक नवनाथ रुपनवर सर यांनी केलेले होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom