“ऐकावे ते नवलच” सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत बनावट सोन्यावर खरे सोने तारण कर्ज…

माळशिरस तालुक्यात कुस्ती, पाणी, उत्तम शेती, राजकीय, कला, क्रीडा क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या गावात धक्कादायक प्रकार….
माळशिरस (बारामती झटका)
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत माळशिरस तालुक्यात बँकेच्या शाखेत बनावट सोन्यावर खरे सोने तारण कर्ज लाखो रुपयाचे दिलेले आहेत. सदरच्या प्रकारामध्ये सोन्याचे व्हॅल्युएशन करणारा सोनारच जबाबदार असतोच असे नाही तर या सर्व गैरप्रकाराला बँकेतील अधिकारी व कर्मचारी यांच्यासह सोने तारण कर्ज करणारा कर्जदार खातेदार सुद्धा तेवढाच जबाबदार असतो. माळशिरस तालुक्यातील कुस्ती, पाणी, उत्तम शेती, राजकीय, कला, क्रीडा क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या गावात धक्कादायक प्रकार घडलेला आहे. लवकरच संबंधित गावच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हा नोंद होणार आहे.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या माध्यमातून उत्पादक शेतकरी यांच्याशी घनिष्ठ संबंध येतो. विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून पीक कर्ज रोख्यामार्फत दिले जाते. अशावेळी बँकेतील अधिकारी व कर्मचारी यांचा शेतकऱ्यांशी थेट संबंध येतो. रोखा झाल्यानंतर संस्थेचा सचिव बँकेतील अधिकारी व कर्मचारी यांना हॉटेल, परमिट रूम, लॉज या ठिकाणी मनसोक्त व मनपसंत पार्ट्या दिल्या जातात. यामधून हुशार शेतकरी सभासद आपल्या हुशारीने अधिकारी व कर्मचारी यांचा आर्थिक हितसंबंधाने फायदा घेत असतात. माळशिरस तालुक्यामध्ये कुस्ती, पाणी, उत्तम शेती, राजकीय, कला, क्रीडा क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या गावांमध्ये सदरच्या गावाची माळशिरस तालुक्यात प्रतिष्ठा आहे. अशा प्रतिष्ठित गावांमध्ये बनावट सोन्यावर खरे सोने तारण कर्ज घेणारे हुशार व चतुर सभासद यांनी बेन्टेक्स सोन्यावर सोनाराच्या म्हणजेच व्हॅल्युएशन करणाऱ्याकडून लाखो रुपये कर्ज उचललेले आहे.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे वरिष्ठ अधिकारी यांच्या सदरची बाब लक्षात आल्यानंतर प्रकरणाचा उलगडा झालेला आहे. बनावट सोन्याच्या पिशव्या खोलण्याअगोदरच सोनाराने खोट्या सोन्याचे अगोदरच खरे सांगितले, असा प्रकार आहे. उपस्थित अधिकाऱ्यांनी सदरच्या ठिकाणचा पंचनामा केलेला आहे. आषाढी वारी श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज यांच्यासह अनेक पालख्या माळशिरस तालुक्यात असल्याने पोलीस प्रशासन पालखी सोहळा बंदोबस्तात व्यस्त आहेत. त्यामुळे पालखी सोहळा मार्गस्थ झाल्यानंतर सदरच्या प्रकरणाला मुहूर्त लागणार आहे. तोपर्यंत बातमी कानाकोपऱ्यात पसरलेली आहे. अनेकजण आपापल्या पद्धतीने बचाव करण्याच्या प्रयत्नात आहेत. 40 खातेदारांनी असा गैरप्रकार करून गावाची बदनामी केलेली आहे. त्यामध्ये समाविष्ट असणाऱ्यांची नावे लवकरच पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झाल्यानंतर समाज माध्यमांसमोर येणार आहे.
माळशिरस तालुक्यात धक्कादायक प्रकार घडलेला आहे. सध्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर प्रशासक आहे. महाराष्ट्र राज्याचे सरकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सदर प्रकरणाच्या मुळाशी जाऊन दोषी व जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर, कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करावी, अशी बँकेतील सुज्ञ व सौजन्यशील शेतकरी सभासद बांधवांमधून प्रतिक्रिया येत आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



