लेबर फेडरेशनचे माजी चेअरमन माळीनगर गावचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत शिंदे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन…

महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी पार्थिव देहावर पुष्पहार अर्पण केला..
माळीनगर (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे विश्वासू सहकारी माळीनगर, ता. माळशिरस गावचे प्रगतशील बागायतदार व लेबर फेडरेशन सोलापूर माजी चेअरमन श्री. चंद्रकांत भिवाजी शिंदे उर्फ सिबी आप्पा यांचे सोमवार दि. २१/७/२०२५ रोजी दुपारी वयाच्या ८० व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झालेले आहे. आप्पांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर अकलूज येथील अकलाई स्मशानभूमी येथे शोकाकुल वातावरणात सायं. ७.३० वा. अंतिम संस्कार करण्यात आले. महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष युवा नेते डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी आप्पांच्या पार्थिव देहावर पुष्पहार अर्पण केला. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आप्पांचा रक्षाविसर्जन तिसऱ्याचा कार्यक्रम बुधवार दि. २३/७/२०२५ रोजी सकाळी ७.३० वाजता होणार आहे.

आप्पांच्या दुःखद निधनाने शिंदे परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. शिंदे परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो व आप्पांच्या आत्म्यास शांती लाभो हीच बारामती झटका परिवार यांच्याकडून भावपूर्ण आदरांजली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



