ताज्या बातम्याराजकारण

विकसित अकलूजचे सत्ताकेंद्र विजय चौकातील जन कुसुम ठरणार, मतदारांची कुजबुज…

राज्यात देवाभाऊ, जिल्ह्यात जयाभाऊ, तालुक्यात रामभाऊ यांच्या संकल्पनेतून विकसित अकलूजच्या स्वप्नासाठी एकत्र आले सर्व जाती धर्मातील मतदार भाऊभाऊ…

अकलूज (बारामती झटका)

आशिया खंडातील सर्वात मोठी समजल्या जाणाऱ्या अकलूज ग्रामपंचायतीचे नगर परिषदेमध्ये रूपांतर झाल्यानंतर प्रथमच नगरपरिषदेची चुरशीची व रंगतदार निवडणूक पार पडलेली आहे. नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित असल्याने पहिल्यांदाच जिजाऊ, सावित्री, अहिल्या, रमाई विचारांच्या पाच महिला निवडणूक रिंगणामध्ये उभ्या होत्या. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाच्या रेशमा लालासाहेब आडगळे, वंचित बहुजन आघाडीच्या उषा सुनील कांबळे, भाजप व महायुती गटाच्या पूजा करण कोतमिरे, राष्ट्रवादी काँग्रेस आरबीआय लहुजी शक्ती सेना गटाच्या ॲड. दिव्यानी सुधीर रस्ते, महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या सुवर्णा अनिल साठे, अशा पाच महिला भगिनी निवडणूक रिंगणात होत्या. सध्या सर्वच उमेदवारांचे भवितव्य मतपेटीमध्ये बंद आहे.

अकलूज माळेवाडी नगरपरिषदेच्या पहिल्या नगराध्यक्ष पदाचा मान कोणाला मिळणार, अशी तालुक्यात, जिल्ह्यात व राज्यात चर्चा सुरू आहे. मात्र, अकलूजच्या मतदारांमध्ये तर्कवितर्क सुरू आहेत. विकसित अकलूजचे सत्ता केंद्र विजय चौकातील पूजा करण कोतमिरे यांचे जन कुसुम निवासस्थान सत्ता केंद्र होईल, अशी मतदारांमध्ये कुजबुज सुरू आहे.

महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार मा. खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय मा. आमदार आरोग्यदूत राम सातपुते यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती फत्तेसिंह माने पाटील, सेवानिवृत्त सनदी अधिकारी शैलेशजी कोतमीरे, भारतीय जनता पार्टीचे अकलूज शहराध्यक्ष महादेवराव कावळे यांच्यासह भाजप व महायुतीच्या निष्ठावान व प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन अकलूज विकसित संकल्पना व मतदारांसमोर मांडलेला जाहीरनामा निवडणुकीतील नगराध्यक्ष व नगरसेवक योग्य उमेदवारी परफेक्ट नियोजन या सर्व बाबी जुळवून आणलेल्या होत्या.

प्रस्थापितांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्षित करून विकासापासून कोसो दूर ठेवलेल्या अनेक गोष्टींमुळे अकलूज माळेवाडी हद्दीतील सर्व जाती धर्मातील मतदार बांधव भाऊभाऊ म्हणून एकवटले आहेत. खऱ्या अर्थाने राज्यात देवाभाऊ, जिल्ह्यात जयाभाऊ आणि तालुक्यात रामभाऊ यांच्या संकल्पनेतून विकसित अकलूजच्या स्वप्नासाठी मतदारांनी परिवर्तन करण्याचा निर्णय घेतल्याची कुजबूज सुरू आहे.

केंद्रात नरेंद्रजी मोदी, राज्यात देवेंद्रजी फडणवीस व सोलापूर जिल्ह्याचे खमके पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यामुळे विकसित अकलूजचे स्वप्न साकार होण्यासाठी माजी आमदार राम सातपुते निश्चित प्रयत्न करतील, असा विश्वास अकलूजच्या जनतेला निर्माण झालेला आहे. माळशिरस तालुक्यात लोकप्रतिनिधी कसा असावा हे, तत्कालीन आमदार राम सातपुते यांनी विकास कार्यातून दाखवून दिलेले आहे. सांगता सभेच्या वेळी लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ऑनलाइन येऊन अकलूजच्या जनतेला भाजप व महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. पूजा करण कोतमिरे व नगरसेवक पदाचे उमेदवार यांना निवडून देण्याचे आवाहन करून अकलूजच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासित केलेले होते. त्यामुळे मतदारांनी विकासाच्या मुद्द्यावर विकसित अकलूज होणार म्हणून भाजप व महायुतीच्या उमेदवारांना मतदान केले असल्याचे मतदारांमध्ये कुजबुज सुरू आहे. मतदारांच्या चर्चेमुळे सत्ता परिवर्तन झाल्यास विकसित अकलूजचे सत्ता केंद्र विजय चौकातील जन कुसुम ठरणार असेही राजकीय विश्लेषक व राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom