ह. भ. प. बापूसाहेब महाराज देहुकर यांचे पानीव येथे सुश्राव्य कीर्तन होणार

कै. शिवाजी निंबाळकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन
पानीव (बारामती झटका)
कै. शिवाजी गणपत निंबाळकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे आयोजन रविवार दि. १६/८/२०२६ रोजी पानीव, ता. माळशिरस येथे करण्यात आले आहे. या पुण्यस्मरणानिमित्त जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे वंशज देहु संस्थानचे माजी अध्यक्ष ह. भ. प. श्री. बापूसाहेब महाराज देहूकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कीर्तनानंतर आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले आहे.

या पुण्यस्मरण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त निंबाळकर परिवार, पानीव यांच्या वतीने करण्यात आले आहे.


नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



