ताज्या बातम्याराजकारण

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या ॲड. संजीवनीताई पाटील यांनी लढवय्या नगरसेविका सौ. रेश्माताई टेळे यांचा पेढा भरवून सन्मान केला…

सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या माळशिरस नगरपंचायतीच्या माजी नगरसेविका भाजपच्या ज्येष्ठ नेत्या ॲड. संजीवनी ताई पाटील यांनी माळशिरस नगरपंचायतीच्या अभ्यासू, हुशार व डॅशिंग नगरसेविका सौ. रेश्माताई सुरेशराव उर्फ सूर्यकांत टेळे यांनी न्यायालयीन लढाई जिंकल्याचा सन्मान….

माळशिरस (बारामती झटका)

सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या माळशिरस नगर पंचायतीच्या माजी नगरसेविका भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या ॲड. संजीवनीताई पाटील यांनी माळशिरस नगरपंचायतीच्या अभ्यासू, हुशार व डॅशिंग नगरसेविका सौ. रेश्माताई सुरेशराव उर्फ सूर्यकांत टेळे यांनी न्यायालयीन लढाई जिंकल्याबद्दल भाजपच्या ज्येष्ठ नेत्या संजीवनीताई पाटील यांनी लढवय्या नगरसेविका रेश्माताई टेळे यांचा माळशिरस येथील कमळ मळ्यातील निवासस्थानी हार, शाल व श्रीफळ देऊन सन्मान करून आनंदाने पेढा भरवण्यात आला.

माळशिरस नगरपंचायतीच्या अभ्यासू, हुशार व डॅशिंग नगरसेविका सौ. रेश्माताई टेळे यांना जिल्हाधिकारी सोलापूर यांनी अपात्र ठरवलेले होते. रेश्माताई टेळे यांनी नगर विकास विभागाकडे अपील दाखल केलेले होते. प्राधिकरण अधिकारी उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला स्थगिती देऊन आज नगरपंचायत सभागृहामध्ये स्वाभिमानाने दमदार एन्ट्री केलेली होती. अशा लढवय्या नगरसेविका रेश्माताई टेळे यांचा सन्मान अनुभवी व राजकीय मुत्सद्दीपणाने राजकारणात यशस्वी असणाऱ्या ॲड. संजीवनीताई पाटील यांनी निवासस्थानी सन्मान केलेला असल्याने भविष्यात रेश्माताई टेळे यांना लढण्यासाठी हजार हत्तीचे बळ मिळाले आहे…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button