जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुलदीप जंगम यांची तडकाफडकी बदली…

सोलापूर जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुशल जैन यांची नियुक्ती….
सोलापूर (बारामती झटका)
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुलदीप जंगम यांची तडकाफडकी बदली बुधवार दि. 15/04/2026 रोजी बदलीचे आदेश दिलेले आहे.
सदरच्या आदेशात, शासनाने आपली बदली केली असून आपली नियुक्ती अतिरिक्त महापालिका आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी पुणे या रिक्त पदावर केलेली आहे. आपल्या जागी श्री. कुशल जैन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तरी आपण आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार विभागीय आयुक्त पुणे विभाग यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्यांकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार त्वरित स्वीकारावा, असे आदेश देण्यात आलेले आहेत..

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



