जातां पंढरीसी सुख वाटे जीवां | आनंदें केशवा भेटतांचि ||

वारकऱ्यांसाठी भाजपा महायुती सरकारने एक मोठी खुशखबर आणली..
मुंबई (बारामती झटका)
आषाढी वारी म्हणजे पिढ्यानपिढ्या महाराष्ट्राच्या हृदयात वसणारी भक्तीची अखंड आणि चिरंतन परंपरा आहे. इथे सामाजिक समरसतेचा त्रिवेणी संगम साधत, अवघा महाराष्ट्र विठ्ठलनामाच्या गजरात रंगून जातो आणि संपूर्ण आसमंत ‘विठ्ठलमय’ होऊन जातो. वारकऱ्यांसाठी आपल्या भाजपा-महायुती सरकारने एक मोठी खुशखबर आणली आहे.
६ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत भूवैकुंठ पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या पालख्या तसेच भाविकांच्या हलक्या आणि जड वाहनांना भाजपा-महायुती सरकारच्या वतीने टोलमाफीची भेट देण्यात आली आहे. यासाठी भाविकांना पोलीस स्टेशन, वाहतूक पोलीस चौक्या आणि आर.टी.ओ. ऑफीस या ठिकाणी टोलमाफीचे स्टीकर्स/पास मिळतील. विशेष म्हणजे हे स्टीकर्स/पास परतीच्या प्रवासासाठी देखील ग्राह्य धरण्यात येणार आहेत.

हिंदू धर्माची पताका अभिमानाने फडकत राहावी यासाठी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार सदैव कटिबद्ध आहे.
टिप – या स्टिकर्सचा विहित नमुना सोबत देत आहोत.
[ Ashadh Vaari, Vitthal, Jai Hari Vitthal, Toll-Free Vaari, Vaarkari, Hindu Pilgrimage, Hinduism, Maharashtra Heritage, Maharashtra Culture, Devendra Fadnavis, BJP4Maharashtra ]
TollFreeVaari #AshadhVaari #DevendraFadnavis #BJP4Maharashtra
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



