ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

कृष्णा-नीरा-भीमा डायव्हर्शन प्रकल्पासाठी २४ कोटी रुपये मंजूर

कार्यतत्पर पाणीदार माजी खा. रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रयत्नाला यश – बबनदादा शिंदे

माढा (बारामती झटका)

माढा लोकसभा मतदारसंघासह दुष्काळी भागासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा प्रकल्प म्हणजे कृष्णा नदीच्या अतिरिक्त पाण्याचे डायव्हर्शन करून निरा नदीमार्गे उजनी धरणात पाणी आणणे असा असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सर्वेक्षण, अन्वेषण व सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपी) तयार करण्यासाठी राज्य शासनाने २४ कोटी पाच लाख ६७ हजार १२५ रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे.

२२ जुलै २०२६ रोजी जलसंपदा विभागाने हा शासन निर्णय जाहीर केला आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नास यश आले असून माढ्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे व माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा देखील या प्रयत्नात सिंहाचा वाटा आहे.

माढाचे माजी आमदार बबनदादा शिंदे म्हणाले की, पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी कृष्णा नदीचे अतिरिक्त पाणी या नदीवरील साप्तेवाडी बंधाऱ्यापासून नीरा नदीवरील उद्धट बंधाऱ्यापर्यंत आणणे हा पहिला टप्पा तर उद्धट बंधारा ते उजनी धरणात पाणी आणणे हा दुसरा टप्पा असून या प्रकल्पाची मागणी त्यांनी राज्य शासनाकडे तसेच संबंधित विभागाकडे वारंवार लावून धरली होती, यासाठी केंद्र पातळीवरून उच्चस्तरीय बैठकीही सातत्याने विषय मांडून प्रयत्न केले आहेत. त्यांच्या प्रयत्नाला यश मिळाल्याने या महत्त्वाच्या डायव्हर्शन प्रकल्पाच्या पुढील प्रक्रियेला गती मिळणार आहे, हा प्रकल्प आशियाई विकास बँकेच्या (एडीबी) सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यांतर्गत दोन टप्प्यात राबवण्यात येणार आहे. यातील दुसऱ्या टप्प्यातील उध्दट बंधारा नीरा नदी ते भीमा उजनी धरण या टप्प्याचे काम २०२२ मध्ये सुरू झाले होते परंतु, तेही अपूर्णच राहिले आहे. त्यामुळे आता संपूर्ण प्रकल्पाचे आवश्यक ते सर्वेक्षण डिझाईन आणि सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम होणार आहे. या प्रकल्पामुळे कृष्णा खोरे पाणी लवादाने महाराष्ट्राला मंजूर केलेल्या पाण्याचा अधिक प्रभावी वापर होणार असून कोल्हापूर, सांगली, सोलापूर व माढा परिसरातील दुष्काळी भागासाठी सिंचन व पिण्याच्या पाण्याचा मोठा साठा उपलब्ध होणार आहे.

माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी माढ्याचे खासदार होताच २००० पासून कृष्णेच पाणी ड्रायव्हर्शन करून उजनीत आणण्याच्या प्रकल्पासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न केले. त्यातील दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू असताना आशियाई बँकेचे प्रतिनिधी मी स्वतः मा. खासदार निंबाळकर, विधानसभा सदस्य जयकुमार गोरे, मा. आ. बबनदादा शिंदे व कृष्णा खोरेचे अधिकारी यांच्यासमवेत पाहणी केली होती. रणजितसिंह नाईक निंबाळकर पुन्हा खासदार झाले असते तर आतापर्यंत या प्रकल्पाच्या कामात मोठी प्रगती दिसून आली असती. तरीपण रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे केंद्रात वरीष्ठाशी असलेले संबंध व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सहकार्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास निधी कमी पडणार नाही हे निश्चित. – संजयमामा शिंदे माजी आमदार

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button