आरोग्यवर्धिनी केंद्र माळशिरस च्या अध्यक्षपदी ॲड. रेश्माताई टेळे

माळशिरस (बारामती झटका)
आरोग्यवर्धिनी केंद्र माळशिरस च्या अध्यक्षपदी माळशिरस नगरपंचायतीच्या विद्यमान नगरसेविका ॲड. रेश्माताई टेळे यांची निवड झाले आहे. लोकसहभागातून आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने शासनाने स्थानिक विधानसभा सदस्य यांच्या अध्यक्षतेखाली एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे.

नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र माळशिरस समिती तसेच रुग्णालयातील रुग्ण कल्याण समिती यात लोकप्रतिनिधी म्हणून आपली भूमिका तितकीच महत्त्वाची आहे. आरोग्य, स्वच्छता, पोषण, पाणी, गुणवत्ता व रोगप्रतिबंधक उपाययोजनांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढवून आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी आपण सक्रिय सहभाग घ्यावा, असे पत्र मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण महाराष्ट्र राज्य प्रकाश आबिटकर यांनी दिले आहे.
या निवडीमुळे सर्वत्र कौतुक होत आहे. रेश्मा ताई या नगरसेविका असून त्यांनी यापूर्वी अनेक महत्त्वाच्या विषयावर लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. याची दखल घेऊन मंत्री प्रकाश आबीटकर यांनी टेळे यांची निवड केली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



