ताज्या बातम्यासामाजिक

शिवशंकर बझारच्या समोर वाहतुकीची कोंडी, अकलूज नगर परिषद व पोलीस स्टेशन लक्ष देतील का ?

अकलूज (बारामती झटका)

अकलूज, ता. माळशिरस शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात जुने एसटी स्टँड ते सदुभाऊ चौक व सदुभाऊ चौकातून गाय वासरू चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवीन एसटी स्टँड आहे. त्यामुळे येणा-जाणाऱ्या बस याच मार्गाने जात असतात. तसेच सदाशिवराव माने विद्यालय व जिजामाता कन्या प्रशाला याच मार्गावर आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक यांची याच रस्त्यावर चार चाकी, दोन चाकी, सायकल अशा वाहनांची नेहमी वर्दळ असते.

अकलूज शहरातील मुख्य रस्ता म्हणून या रस्त्याकडे पाहिले जाते. याच रस्त्यावर शिवशंकर बझार आहे. बझारच्या खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची गर्दी असते. त्यामुळे शिवशंकर बझार समोर वाहतुकीची कायमच कोंडी असते. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास होतो. याकडे अकलूज नगर परिषद व अकलूज पोलीस स्टेशन लक्ष देतील का ?, असा त्रस्त नागरिकांमधून सवाल उपस्थित केला जात आहे..

शिवशंकर बझारला स्वतःची पार्किंग व्यवस्था नाही. खरेदीसाठी आलेली वाहने ग्राहक व्यवस्थित लावत नाहीत. शिवशंकर बझारच्या समोर नगरपंचायतीचे काम सुरू आहे. काम सुरू आहे तोपर्यंत तरी शिवशंकर बझार स्वतःचा एखादा माणूस लावून आडव्या तिडव्या असणाऱ्या मोटरसायकली किंवा चार चाकी यांना शिस्त जरी लावली तरी सुद्धा वाहतूक कोंडी होणार नाही. मात्र हे करणार कसे ?, कारण याची मालकच प्रस्थापित आहेत. प्रस्थापितांना कोण सांगणार ?, एक त्रस्त व्यक्ती तर म्हणाला मांजराच्या गळ्यात कोण घंटा बांधणार ?, असे अनेक त्रस्त नागरिक बोलत आहेत.

यासाठी नगरपंचायत अकलूज व अकलूज पोलीस स्टेशन बझारच्या समोर कोंडी करणाऱ्या वाहनांवर कारवाही करतील का ?, अशीही अकलूज पंचक्रोशीमध्ये खुमासदार चर्चा सुरू आहे. इतर ठिकाणी थोडी सुद्धा वाहतूक कोंडी चालत नाही मग याच ठिकाणी का ?, असाही सवाल उपस्थित होत आहे..

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button