ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

रत्नत्रय पतसंस्थेचे सचिव ज्ञानदेव राऊत यांची वाल्या सारखी अवस्था, दसरा जेलमध्ये दिवाळी तरी घरामध्ये….

तक्रारदाराच्या आरोपात चेअरमन व संचालक मंडळ कटात सहभागी असताना मोकाट का ?

सदाशिवनगर (बारामती झटका)

रत्नत्रय बिगर शेती ग्रामीण पतसंस्थेचे सचिव ज्ञानदेव उर्फ ज्ञानेश राऊत यांची पुराण काळातील गोष्टीतील वाल्यासारखी अवस्था झालेली आहे. माळशिरस पोलीस स्टेशन येथे दि. 06/10/2026 रोजी दिलेल्या तक्रारीवरून अटक करण्यात आलेली होती. त्यामध्ये बनावट कागदपत्र, सह्या यांच्यासह अनेक गंभीर बाबींचा तक्रारीत उल्लेख केलेला होता. तक्रारीमध्ये रत्नत्रय पतसंस्थेचे सचिव, चेअरमन व संचालक मंडळ अशी नावे असताना तक्रारदारांच्या आरोपातील चेअरमन व संचालक मंडळ कटात सहभागी असताना मोकाट का ?, असा पुरंदावडे सदाशिवनगर परिसरामध्ये सवाल उपस्थित केला जात आहे..

कोणत्याही पतसंस्थेचा बँकिंग व्यवहार सचिव पहात असले तरी चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ यांचे नियंत्रण असते‌. सचिव पतसंस्थेचे कामकाज करीत असताना होणारा नफा व फायदा स्वतःच्या घरी नेत नसतात. पतसंस्थेच्या नफ्यात व भाग भांडवलामध्ये वाढ होत असते. तशाच पद्धतीने रत्नत्रय पतसंस्थेचे सचिव ज्ञानदेव उर्फ ज्ञानेश राऊत यांनी कर्ज प्रकरणांमध्ये तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार बनावट कागदपत्रे व सह्या करून कर्ज प्रकरण केले, असा तक्रारी अर्जात उल्लेख आहे. मग कर्ज प्रकरण सचिव यांच्या सहीने होत नसते. यासाठी चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाची शिफारस असावी लागते. मग भ्रष्टाचार किंवा अनियमित झाल्यानंतर सचिवा एवढेच चेअरमन व संचालक मंडळ जबाबदार असायला हवे. मात्र रत्नत्रय पतसंस्थेच्या सचिवाची वाल्यासारखी अवस्था झालेली आहे.

दसरा हा जेलमध्ये गेलेला आहे. दिवाळी तरी घरामध्ये व्हावी अशी मित्रपरिवार व नातेवाईक यांची इच्छा आहे. कटामध्ये सहभागी असणारे चेअरमन व संचालक मंडळ यांना अटक झालेली नाही. त्यांना फक्त नोटीस देऊन मोकाट सोडलेले आहे. माहिती घेऊन सविस्तर वृत्त क्रमशः…..

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button