मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सूक्ष्म नियोजन आणि प्रशासकीय समन्वयावर भर!

सोलापूर (बारामती झटका)
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात आणि राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ यांच्या संकल्पना व मार्गदर्शनानुसार मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सोलापूर जिल्ह्यात प्रभावीपणे आणि यशस्वीरीत्या राबविण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकजुटीने, समन्वयाने आणि जबाबदारीने काम करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी केले.
अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आयोजित आढावा बैठकीत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या गावनिहाय प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. अभियानाची उद्दिष्टे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रत्येक तालुक्याने सूक्ष्म नियोजन करून गावनिहाय कामांना गती द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या. यावेळी प्रलंबित कामे, उद्दिष्टपूर्ती, प्रत्येक गावातील सद्यस्थिती आणि आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखत अभियानातील प्रत्येक घटकाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असेही निर्देश देण्यात आले.

या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) सूर्यकांत भुजबळ यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
#Jaykumar Gore
#BJP #Maharashtra
#ZillaParishadSolapur
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



