सदाशिवनगर येथील सौजन्यशील व धार्मिक व्यक्तिमत्त्वाचा मा. आमदार राम सातपुते यांच्याकडून वाढदिवसानिमित्त सन्मान…

सदाशिवनगर (बारामती झटका)
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी सदाशिवनगर येथील सौजन्यशील व धार्मिक व्यक्तिमत्व असणारे श्री. सुभाष सुज्ञे उर्फ हरिओम यांचा वाढदिवसानिमित्त श्रीराम बंगला निवासस्थानी यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी कचरेवाडीचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व सोमनाथआबा कचरे, भारतीय जनता पार्टी नातेपुते मंडल उपाध्यक्ष हरिभाऊ पालवे पाटील, आमदारांचे स्वीय सहाय्यक बालाजी नरळे, आदी उपस्थित होते.

सुभाष सुज्ञे यांना हरीओम या नावाने ओळखले जाते. ते अत्यंत धार्मिक व मनमिळावू स्वभावाचे आहेत. रोज सकाळी व सायंकाळी देवांची पूजाअर्चा, आराधना, उपासना न चुकता मनोभावे करीत असतात. साक्षी व्हरायटिस या दुकानाच्या माध्यमातून सुज्ञे परिवार यांचा उदरनिर्वाह सुरू असतो. वीरशैव लिंगायत समाजामध्ये त्यांना मानाचे स्थान आहे. अल्पसंख्यांक असल्याने राजकारणा पलीकडे त्यांची मैत्री असते. माजी आमदार राम सातपुते यांच्या विश्वासू मित्रांपैकी ते एक आहेत. त्यांना श्रीराम निवासस्थानी मानाचे स्थान असते. वाढदिवसाचे औचित्य साधून आरोग्यदूत राम सातपुते यांनी त्यांचा फेटा, शाल, श्रीफळ, गुच्छ देऊन सन्मान केलेला आहे…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



