मोहिते-पाटील गटाचे सोलापूर जिल्ह्यात पटांगणं, जिल्ह्याच्या राजकारणात मोहिते-पाटलांना सत्तेपासून दूर ठेवण्याची हॅट्रिक केली…

सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांची खेळी यशस्वी…
माळशिरस (बारामती झटका)
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यातील आजी-माजी पदाधिकारी यांनी जिल्हा बँकेचे दहा संचालक बिनविरोध करण्यात सर्वांनी एकमत केलेले होते. उर्वरित नऊ जागांची निवडणूक लागलेली होती, त्यामध्ये भारतीय जनता पार्टी व मित्रपक्ष सहकार विकास पॅनलच्या आठ जागा निवडून आलेल्या आहेत, तर मोहिते-पाटील गटाला एकमेव जागेवर समाधान मानावे लागलेले आहे. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोहिते-पाटील गटाचे पटांगण झालेले आहे. जिल्ह्याच्या राजकारणात मोहिते-पाटलांना सत्तेपासून दूर ठेवण्याची हॅट्रिक झालेली आहे. सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांची खेळी यशस्वी झालेली आहे.
गोरे मानदेशी पट्टीचे खेळाडू!
ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा पदभार घेतल्यापासून मोहिते-पाटील व मोहिते-पाटील गटाच्या नेते व कार्यकर्त्यांमध्ये पोटसूळ उठलेला होता. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याबद्दल सोशल मीडियावर नेते व कार्यकर्ते अपशब्द वापरून जयकुमार गोरे यांची प्रतिमा मलिन करीत होते. “बाहेरून आलेले आहेत, जिल्ह्यातील आम्हीच वतनदार आहोत” अशा पद्धतीने वल्गना करून जिल्ह्यामध्ये नामशेष होत चाललेले राजकीय अस्तित्व टिकवण्याकरता केविलवाणे प्रयत्न सुरू होता. परंतु जयकुमार गोरे हे मानदेशी पट्टीचे खेळाडू असल्याने राजकीय कसब वापरून मोहिते-पाटील यांची जिल्ह्यावर असणारी पकड ढिली करून सोडलेली आहे.

गोरेंची हॅट्रिक अशी –
सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राजाभाऊ राऊत यांचा विजय केलेला आहे. सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, चार सभापती यांच्या निवडीमध्ये समन्वय साधलेला आहे. सोलापूर महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवलेला आहे. सोलापूर जिल्ह्याच्या 11 पंचायत समितीपैकी दहा पंचायत समितीवर भाजप विचाराचे सभापती विराजमान केलेले आहेत.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोहिते-पाटील गटाचा त्यांच्याच परिवारातील एकमेव सदस्य अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांना 83 मते घेऊन माळशिरस तालुक्यातील सोसायटी मतदार संघातून निवडून आणण्यामध्ये जरी यशस्वी झाले असले, तरीसुद्धा माजी आमदार राम सातपुते यांनी बाबाराजे देशमुख यांना 33 मते घेऊन भविष्यामध्ये आव्हानच केलेले आहे. आमदार उत्तमराव जानकर गटाचे ज्ञानराज पाटील यांना 24 मते अशी सध्याची राजकीय परिस्थिती आहे. निश्चितपणे जयकुमार गोरे यांनी मोहिते-पाटील यांचे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय साम्राज्य उध्वस्त केलेले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



