मा. आमदार राम सातपुते दुसऱ्या क्रमांकावर तर विद्यमान आ. उत्तमराव जानकर तिसऱ्या क्रमांकावर…

सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सहकार क्षेत्रात माजी आमदार राम सातपुते गटाची मुसंडी…
अकलूज (बारामती झटका)
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माळशिरस तालुका वगळता जिल्ह्यामध्ये सर्वच तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी व मित्रपक्ष सहकार विकास पॅनलचे 10 जिल्हा बँकेचे संचालक बिनविरोध व 8 निवडणुकीत संचालक निवडून आलेले आहेत.
माळशिरसचा निकाल असा –
मोहिते-पाटील गटाचे अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांना 83 मतदान पडलेले आहे. माजी आमदार राम सातपुते गटाचे शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख यांना 33 मतदान पडलेले आहे, तर विद्यमान आमदार उत्तमराव जानकर गटाचे ज्ञानराज उर्फ माऊली पाटील यांना 24 मतदान पडलेले आहे. एक मत बाद झालेले आहे.
मोहिते-पाटील गटाचे उमेदवार जरी निवडून आले असले, तरी माजी आमदार राम सातपुते दुसऱ्या क्रमांकावर तर विद्यमान आमदार उत्तमराव जानकर तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सहकार क्षेत्रात माजी आमदार राम सातपुते गटाची मुसंडी असल्याची माळशिरस तालुक्याच्या सहकार क्षेत्रासह राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे.
मोहिते-पाटलांना धोक्याची घंटा!
सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्यापासून माळशिरस तालुक्याच्या सहकार क्षेत्रावर मोहिते-पाटील परिवारांचे वर्चस्व कायम राहिलेले आहे. सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या पक्षात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी माळशिरस सोसायटी मतदार संघातून अनेक वर्ष संचालक राहिलेले आहेत. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या विरोधात दोनदा उत्तमराव जानकर यांनी उमेदवार उभे केलेले होते, त्यावेळेस 27 मतदान विरोधामध्ये पडलेले होते. पहिल्यांदाच माजी आमदार राम सातपुते यांनी बाबाराजे देशमुख यांच्या रूपाने 33 मतदान घेऊन भविष्यात सहकार क्षेत्रात जोरदार मुसंडी मारलेली आहे.

मोहिते-पाटील गटाने 80 सदस्य सभासद दहा दिवस टूरवर नेलेले होते. घरातील सात सदस्य व इतर दहा सदस्य संपर्कात होते, तरीसुद्धा 83 मतावरच समाधान मानावे लागलेले आहे. त्यामुळे मोहिते-पाटील यांना भविष्यात माळशिरस तालुक्याच्या सोसायटी मतदार संघात सुद्धा धोक्याची घंटा असणार आहे.
आता नवी सोसायट्यांची लाट येणार!
माळशिरस तालुक्यात अनेक गावांमध्ये सेवा सोसायटी काढायची इच्छा असताना सुद्धा प्रस्थापित मोहिते-पाटील यांनी अनेकांच्या सोसायटी अडवून ठेवलेल्या होत्या. सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून माळशिरस तालुक्यात माजी आमदार राम सातपुते यांच्या विचाराच्या अनेक सेवा सोसायटी निर्माण होणार आहेत. कसलाच सहकाराचा अनुभव नसताना चांगल्या पद्धतीने प्रस्थापितांना लढत दिलेली असल्याने राम सातपुते गटाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाची एकहाती सत्ता असल्याने माळशिरस तालुक्यातील सेवा सोसायटीच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ यांच्या मनामध्ये असलेल्या शेतकऱ्यांच्या विषयी आत्मीयता व आर्थिक नियोजन करताना सोयीस्कर होणार आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



